Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsअभिनंदन चे चाणक्य नीती " फोनो फ्रेंड्" दरमहा रकमेचा मासिक व्यवहार!

अभिनंदन चे चाणक्य नीती ” फोनो फ्रेंड्” दरमहा रकमेचा मासिक व्यवहार!

चंद्रपूर 26 मे – “मद्धपूर” जिल्ह्यात सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिनंदन अकलेचे तारे तोडत आहे.
जिल्ह्यातील भ्रष्टाचारा च्या कचाट्यात एकाच वेळी एक लाखाच्या लाच प्रकरणी अडकलेले तीन,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे आणि कार्यालयीन अधीक्षक अभय खाताड हे आता सध्या या विभागातून निलंबित आहे.

मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला पैशाचा काही मोह उतरनेसा झाला आहे. कोल्हापूर पॅटर्न चा एक वरिष्ठ अधिकारी लाच प्रकरणी अडकल्यावर त्याच “कोल्हापूर” मधील दुसरा अधिकारी सध्या” ये तो होता ही रहता है ” करत थापा मारत मासिक हफ्त्या साठी दारू विक्रेत्यांकडे तगादा लावत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम अधिकारी पासून सुरवात करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अभिनंदन सध्या चर्चेत आला आहे.
दर महिन्याला शासकीय पगारा व्यतिरिक्त जवळपास
8 लाख रुपयाचा डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्याचा चा तोराच “उष्मघाता”सारखा आहे?

अभिनंदन चे फर्मान सुदर्शन ही मुकुट पणे पालन करतो. राजुरा, गोंडपिपरी, वीरूर, वरुड रोड,उपरवाही, परसोडा,स्वास्ती, कोरपना, गडचांदूर, जिवती, कोठारी, वनसडी आणि अनेक भागात देशी -विदेशी, बियर शॉपी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या कडून अभिनंदन चे मासिक रेशो बांधले गेले आहे.

“चकित व्हा की भ्रमित व्हा “मात्र अभिनंदन चे वसुली अभियान म्हणजे काळ्या दगडा वरची पांढरी रेघ असल्याचे सांगितले जात आहे. याच अभिनंदन ला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी साठी बोलवले असता तोंडातून वसुली चा ” व ” सुद्धा निघत नव्हता, मुकाट्याने बसून मान हलवून ACB च्या समोर कल्पना नाही करत बयान नोंदविले?
अभिनंदन वर सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर आहे.
पैशासाठी दाही दिशा फिरणाऱ्या या अधिकाऱ्याने नवीन तंत्र वापरत केबीसी सारखा “फोन अ फ्रेंड्”चा वापर करणे सुरु केला आहे. अभिनंदन च्या वसुलीसाठी दोन लोकांची साथ भेटते एक शासकीय तर एक प्रायव्हेट..
वसुलीचा दर मासिक हफ्त्या चा…..
देशी दारू दुकानदार कडून (प्रत्येकी )- 18000₹ मासिक
बियर बार -12000₹ मासिक
बियर शॉपी -3000 मासिक
वाईन शॉप -22000 मासिक
अवैध दारू विक्री – 10000( मोठे ) 5000(छोटे )
अवैध दारू विक्रीतून दरमहा अभिनंदन च्या डिव्हिजन मधून 250000₹ चा मासिक हफ्ता बांधल्या गेला आहे. ग्रामीण भागातील दारुव्यावसायिक अभिनंदन ला प्रसाद चढवूनच आपला सोपस्कार पार पाडतात.
एखाद्या विभागाला लाचखोरी च्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या साथी दाराकडे पाहून जाग आली असती, मात्र बेशरम झाडा सारखे वागणाऱ्या या विभागाच्या अधिकाऱ्याला पैशाचा मोह काही आवरेना झाला आहे?

लांबलचक शैली असणाऱ्या अभिनंदन चा गल्ला म्हणजे मद्द्यपूर मध्ये डल्ला च म्हणावे लागेल. अभिनंदन संधर्भात लाचेची कुठलेही तक्रार असल्याच चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार नोंदवा!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!