चंद्रपूर- 14 सप्टेंबर 2025
( सुशांत घाटे )धडाकेबाज या मराठी चित्रपट मधील एक कॅरेक्टर आहे ते म्हणजे “कवट्या महाकाल”च चेहऱ्या वर कवठी चा मास्क आणि अंगावर काळे काळोख कपडे लावून तो दहशत माजवण्याचा प्रयत्न करतो.त्याचीच प्रतिमा राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराने कवट्या झाली आहे.
👉चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराची दहशत माजवाणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी दलाला आणि कर्मचाऱ्यां मार्फत वसुलीचा मोठा फंडा उभारला आहे. “हम नही सुधरेंगे”म्हणत हा भ्रष्टाचार करणे म्हणजे त्यांचा वरिष्ठ लेवल पर्यंत प्रोटोकाल पाळण्याचा मनसुभा असल्याचे एका अधिकाऱ्याने डेली पोस्टमार्टम ला सांगितले.
गेंड्याची कातडी यांच्या भ्रष्टाचाराला झूकेंगा नही साला करत जिल्हाभरातून हफ्ता वसुलीचा लाखोचा दरमहा बार, देशी दारू दुकानें, वाईन शॉप, बियर शॉपी अवैध दारू विक्रेते यांच्या कडून कलेक्शन फार्मुला हयात केला आहे. काही ठिकाणी कर्मचारी तर काही ठिकाणी दलालांची फोर्स या वसुली साठी ऍक्टिव्हेट आहे?
👉हा तर वरटी चा सुपरशॉट?
जिल्ह्यातील भरारी पथकाची जवाबदारी असलेल्या वर्टी चे बरेच स्वप्न पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त चार्ज मिळाल्याने दन दन बॅटटींग करत वर्टी आपल्या दलाला मार्फत आणि काही कर्मचाऱ्यां मार्फत महिन्याचा जिल्ह्यातील हफ्ता वसुलीचा गोरखधंदा करू लागले आहे. जिल्ह्यात अनेक क्षेत्रात बनावाट दारू चे टास्क येताना मात्र हे भरारी पथक गगन भरारी करू लागले आहे.
गोकुळ, जगन, सुजित आणि पंढरी वाटण्या केलेल्या क्षेत्रात जाऊन हुजुरी हाजी करत साहेबांच्या बालेकिल्यात मुद्राये चे प्रसन्न दर्शन आणून देण्यात यशस्वी होतात. आसन ग्रहण करून बसलेल्या वर्टी महाशय च्या काही कर्मचारी आणि दलालच्या फौज ची वसुलीनामी आता गाजू लागली आहे!
👉 मास्टर इन करप्शन ? PHD देण्याची बाकी…….
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सर्वात मोठा आरोपांच्या विविध जाळ्यात असणाऱ्या राजुरा येथील निरीक्षक अभिनंदन कांबळे यांची भ्रष्टाचारात PHD झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीय लोकांनी डेली पोस्टमार्टम ला सांगितलं आहे?
तूरळक दारू विक्रीच्या कागदपत्रा वर केसेस दाखवून 1 ते 12 तारखे पर्यंत चा वसुलीचा डल्ला मारून “मै चला कोल्हापूर”
करत नवीन फार्मुला तैयार केला असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.स्पेशल 26 कॅरेक्टर सारखे याचे वसुली गुर्गे मुल, सावली, राजुरा, गोंडपिपरी, विरूर, गडचांदूर, जिवती, कोरपना या क्षेत्रातुन 15 लाख रुपयाचा गल्ला दरमहा जमा करून या महाशयला आणून देत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
रायपुरे, कापटे, शिवाजी, जितू गोडबोले, मेश्राम आणि हेमंत या सर्वांच्या मार्फत मास्टर ऑफ करप्शन चा हा बाहुबली सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील सर्वात मोठा तारा चमकत आहे!लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकणाऱ्या तत्कालीन चंद्रपूर चा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधीक्षक पाटील याचा शिष्य असलेला अभिनंदन कांबळे यांच्यावर सुद्धा ACB ची करडी भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात वळून आहे. तसेच बनावट कागदपत्र आणि देशी दारू च्या स्वास्ती येथील चन्ने ब्रदर CL-3 प्रकरणात सुद्धा राजुरा पोलिसांच्या कॅमेऱ्यात सुद्धा याचे या गुन्ह्यात सहभागी असल्याचे चित्र दिसलें आहे. लवकरचराजुरा दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे आणि निरीक्षक अभिनंदन कांबळे यांना अटक होण्याची शक्यता आहे.
👉मुल- सावली ला चेतन?
राज्य उत्पादन शुल्क विभागातील मूल-सावली या क्षेत्रात चेतन अवचट हा कर्मचारी दुय्यम निरीक्षक सागर दीडशे यांच्या अधिनस्त काम करतो.
मुंबई वरून मूल ला दुय्यम निरीक्षक म्हणून आलेले दीडशे यांनी सुरवातीला कायद्याचा बिगुल वाजवला मात्र त्यांचा बिगुल चेतन आणि श्यामवतारी यांनी साईड ला ठेवला. स्टेटमेंट गोळा करण्याच्या 2-3 तारखेलाच सर्वात फास्ट एक्सप्रेस असलेला चेतन येथील कलेक्शन आपल्या आकाला पोहचवून देतो?
उरले सुरले श्याम आपल्या पद्धतीने देव तारी त्याला कोन मारी करत करेक्ट थंब दाखवत शंभरी चा हिशोब सागर किनाऱ्यावर आणून देतो.
भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या अनेक किस्से आता राज्य उत्पादन शुल्क विभागातील फायलीच्या आत श्वास रोखून बसलेल्या आहे. मात्र त्या फायली डेली पोस्ट मार्टम आपल्या आवाजातुन उठवणार आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

