Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsशुक्रान! हबीबी चा इलेक्ट्रिक काटा आणि चीप नी वेकोली ला करोडोने लुटले?...

शुक्रान! हबीबी चा इलेक्ट्रिक काटा आणि चीप नी वेकोली ला करोडोने लुटले? चार दिवस लोटूनही पोलिसात तक्रार न करण्यासाठी 50 लाखाचा डाव फेकला?

चंद्रपूर 26 ऑगस्ट

सुशांत घाटे

– वेकोली ला नव्या तंत्रज्ञान पद्धतीने मोठ्या प्रमाणात फसवत करोडो रुपयाचा स्क्रॅप (भंगार साहित्य )गहाळ करणाऱ्या वाहनाला रंगेहाथ डी.आर.सी खदान पाच मध्ये पकडण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

  • 👉मात्र या बाबतची कुठलीही चोरी च्या घटने संदर्भात पोलिसात वेकोली च्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल न केल्याने यात मोठा सेट्टेलमेंट करीत चंद्रपूर च्या पडोली च्या प्रख्यात भंगार व्यवसायकाने आतापर्यंत करोडो रुपयाचा वेकोली तील अधिकाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना धरून भंगार साहित्यात हात साफ केले आहे?

  • वेकोली मधील स्क्रॅप चे लोखंडी साहित्य ऑनलाईन टेंडर द्वारा विकले जातात, त्या पद्धतीने त्याचे नियम आणि संबंधित यंत्रणा याला हाथाळतात.
  • 💥मात्र चार दिवसा अगोदर एका भंगार व्यवसायका चे मोठे बिंग फुटले! बेंगलोर आणि बिहार मधून आणलेले लोकांच्या मदतीने इलेक्ट्रिक काटा मध्ये सेटिंग करून 50 टन ऐवजी 22 टन च स्क्रॅप असल्याचे दाखवून अशा प्रकारे आतापर्यंत करोडो चा सरकारी भंगार खजाना चा लुटून टाकल्याने त्याची चांगलीच बोम्ब वेकोली मध्ये झाली आहे. सुरक्षा रक्षक, काटा बाबू, आणि संबंधित अधिकाऱ्यांना या बदल्यात लाखोचे  पॉकेट देऊन या भंगार व्यवसायकाने हबीबी डाव खेळला आहे?

आता या संदर्भात नवीन नवीन खुलासे समोर येऊ लागले आहे. कोळसा मध्ये ही अशाच प्रकारे हेराफेरी करून मोठ्या प्रमाणात लाखो टन कोळसा चोरी गेल्याचे सांगण्यात येत आहे! वेकोली नीं या संदर्भात कुठलीही पोलिसांत तक्रार न केल्याने मोठा गदारोळ वेकोली च्या कर्मचाऱ्यामध्ये चर्चेत आला आहे. करोडो रुपयाची स्क्रॅप चोरी करणाऱ्या कंपनी ला ब्लॅकलिस्ट तर सोडा, साधा कारवाई चा फास न आवरल्याने या प्रकरणात वेकोली च्या अधिकाऱ्याने कितीचा स्टॅम्प छापला याची जोरदार चर्चा सुरु आहे.

👇👉हा भंगार व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून वेकोली ला याच प्रकारे लुटत करोडो चा मोठा साठा याच याच्यातून गहाळ केला आहे! वेकोली च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संधर्भात चौकशी चे आदेश देऊन वेकोली ला लुटणाऱ्या या भंगार व्यवसायकाला पोलिसात द्या, जेणेकरून यात कोन कोन वाटेकरी आणि लुटारू याचा सातबारा च बाहेर येईल.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!