यवतमाळ 24 ऑगस्ट
सुशांत घाटे
💥💥💥💥
✨यवतमाळ जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्या संदर्भात आल्या आल्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठिकानी अवैध धंद्या संधर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले!
👉मात्र वणी, राळेगाव मारेगाव, वडकी, मुकुटबन, शिरपूर पोलीस स्टेशन हद्धीत या अवैध धंद्याना लाखोचा मलिंदा लाटण्यात यशस्वी अधिकाऱ्यांनी त्याची मोह माया बाळगत अद्यापही त्याला मोठी बाळगत दिलेली आहे?
👉यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे सध्या च्या परिस्थितीत डोळेजाक करीत दूरदृष्टी साधतं असल्याने सध्या अवैध धंद्याना पाठराखण करीत आहे. संबंधित पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाला चालना मिळत असताना नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या साठी मोठा जिल्ह्यातील अवैध धंद्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे?
💥केवळ व्हिडिओ कॉन्फरेन्स नाही तर ऍक्शन प्लॅन घेऊन त्याना ग्राउंड लेव्हल वर याला निपटारा करण्याची मागणी सामान्य जनतेतुन होऊ लागली आहे. मागील पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांच्या कार्यकिर्दीत यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंधाय्याना रान मोकळे झाले होते मात्र नवीन पोलीस अधीक्षक यांची भूमिका काय यावर सर्वांचे लक्ष आता वेधले गेले आहे!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

