Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsपोलीस विभागातील उंच भरारी गडचिरोली बॉर्डर च्या दिशेने ? जिवन राज चा...

पोलीस विभागातील उंच भरारी गडचिरोली बॉर्डर च्या दिशेने ? जिवन राज चा दारू तस्करीत ला गुरु घंटाल कौन? चांगल्या अधिकाऱ्यांची वर्णी केव्हा लागेल!

  1. चंद्रपूर -7 ऑगस्ट
  2. सुशांत घाटे
    SPECIAL REPORT
  3. 👉गडचिरोली जिल्ह्यात सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि गोंडपिपरी तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करीचे जाळे विनल्या गेले आहे?
    दररोज मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून देशी = विदेशी दारू चा मोठा साठा चारचाकी मोठ्या वाहना मार्फत गडचिरोली जिल्ह्यात नेत असताना दोन्ही ही पोलीस स्टेशन च्या हद्धीत एक ही मोठ्या कारवाई चा बडगा सावली आणि गोंडपिपरी पोलिसांना उगारता आला नाही आहे?
  4. 💥सावली तालुक्याला
    G- वन राज‼️
  5. सावली तालुक्यातील नारायणी, शेंडे, गड्डमवार यांच्या देशी विदेशी दारू च्या विक्री केंद्रावरून हमखास गडचिरोली जिल्ह्यात बिन दिक्कत “जिवन राज”देण्यात येत आहे. या जीवनराज देण्याच्या मागचा
    “गुरु घंटाल” कोन याचा शोध घेणे सध्या राज्यातील,पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.गडचिरोली जिल्ह्यात बेधडक दारू चा अवैध पुरवठा होत असताना संबंधित विभागाचे हाथ जरा जास्तच शेकल्या गेले आहे का? हा मोठा प्रश्न सामान्य जनतेत सध्या चर्चेत आला आहे.

    सावली पोलीस स्टेशन अंतर्गत “धीरज” चा आधार घेत – देत व्याहाड, सावली आणि ग्रामीण भागातून दारू सप्लाय चे डीलर सध्या तोऱ्यात
    “ओ सेठ” करीत फिरत आहे.

    तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांच्या कार्यकाळात विशिष्ट ठिकाणी पोलीस स्टेशन च्या कार्यभार चा सांबाळ करण्या करीता अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पुजा अर्चना करीत कार्यभार मिळवला होता हे विशेष!

    पोलीस निरीक्षक दर्ज्यांच्या अधिकाऱ्यांना कंट्रोल ला ठेवून संबंधित पोलीस स्टेशन ला सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती बहाल करण्यात आली होती. त्यात सावली आणि गोंडपिपरी चा ही समावेश होता हे विशेष!तेच प्रणाली अजूनही का याचाही विचार करणे आवश्यक झाला आहे?

    गोंडपिपरी तालुक्यातुन सुद्धा असाच दारूचा महापूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागा सोबत, तेलंगणा राज्यात पोहचवला जात आहे?मात्र पोलीस विभागातील यंत्रणा यांना रोखण्यात कुचकामी ठरली आहे.

    भंगाराम तळोधी तसेच गोंडपिपरी तील अनेक भागातून दारूचा हा पुरवठा सध्या जोमात गडचिरोली जिल्ह्यात पोहचवला जात आहे.

    💥………..हे विशेष ‼️
    काही दिवसा अगोदर राज्यातील प्रमुख असलेल्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी चॉईस पोस्टिंग वरून एका पोलीस अधीक्षकला खडसावले होते!त्यातच सर्व युनिट प्रमुखांना ही कुठलेही पोस्टिंग संदर्भात तक्रारी येता कामा नये याचे, खास दक्षता घेण्याचा सूचना ही दिल्या होत्या!
    रश्मि शुक्ला यांची खास नजर गडचिरोली जिह्यतील नक्सल प्रभावीत क्षेत्रावर असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि गोंडपिपरी च्या पोलीस स्टेशन हद्दीतुन दारू तस्करीचा बोलबाला मोठ्या प्रमाणात
    गाजत आहे. सावली आणि गोंडपिपरी हे दोन्ही तालुके मोठे असून या ठिकाणी चांगल्या पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
    जिल्ह्यातील गुन्हेगारी चा अंत करण्याकरिता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन जरी ऍक्शन मोड वर असले मात्र काही अती भ्रष्टखोर अधिकाऱ्यांच्या गालबोट नी त्यांची प्रतिमा वर सुद्धा फरक पडत आहे?

    💥राज्य उत्पादन शुल्क विभाग करतो तरी काय?

    जिल्ह्यातील पोखरलेल्या अवैध दारू तस्करीचा ज्यांच्या मुख्य खांद्यावर जवाब दारीचा पवित्रा आहे, मात्र ते निरनिराळे धंदे करीत, आपले वसुलीचे चक्रव्युह अभियान राबवत आहे?आली तारीख की जिल्ह्यातील लाखो चा वसुलीचा डल्ला जमा करायचा आणि महिन्याच्या शेवट च्या तारखेत गावी नेवून पोहचवयचा हाच फार्मुला गेल्या अनेक वर्षपासून जिल्ह्यात सुरु आहे!
    मात्र नव्याने रुजू झालेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी या संदर्भात कडक सूचना केल्या असल्याचे ही सूत्रांनी सांगितले आहे. कुठलीही तडजोड न करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे!
    त्यामुळं संबंधित यंत्रणातील अधिकाऱ्यांवर त्यांची करडी नजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

  6. ‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!