चंद्रपूर -1 ऑगस्ट
जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेला चपराक देण्या करीता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतःच आता सर्व गुन्ह्यांची सूत्रे हाथात घेत जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेला महत्वाच्या सूचना देत कारवाई चा फास आवरण्यास लावले आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी बल्लारपूर येथे एका 24 वर्षीय तरुणाकडून कमरेला लावलेला देशी कट्ट्या सोबत साथ काडतूस जब्त करीत त्या युवकांला बल्लारपूर शहरातून अटक केली आहे आतापर्यंत पोलीस विभागाला सहा बंदुकी जब्त करण्यात यश आले असून आणखी काही युवक पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांनी सांगतले आहे.
💥💥एकाच दिवशी जिल्ह्यातून सहा तडीपार
कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या सहा व्यक्तीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी कारवाई करीत जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यातील दोन युवक हे घुघूस परिसरातील असून चार व्यक्ती हे चंद्रपूर शहरातील आहे. आतापर्यंत एकूण चंद्रपूर पोलिसांनी 22 लोकांना हद्दपार करीत 3 व्यक्ती विरुद्ध MPDA ची कारवाई उगारली आहे. दोन्ही ही सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृवांत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, घुघूस चे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

