Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsसावली वनपरिक्षेत्रातील शेतशिवारात बिबट मृतावस्थेत आढळला.

सावली वनपरिक्षेत्रातील शेतशिवारात बिबट मृतावस्थेत आढळला.

चंद्रपूर: 12 सप्टेंबर ( सुनील तायडे )

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत विरखल येथील भैयाजी वळूजी देशमुख यांच्या शेतीमध्ये बिबट हा मृतावस्थेत आढळला, त्यांच्या शेतालगत असलेले शेतकरी ढिवरुजी चिमुरकर हे शेतीवर धानपीक पाहण्यासाठी गेले असता देशमुख यांच्या शेतीतसावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत विरखल येथील भैयाजी वळूजी देशमुख यांच्या शेतीमध्ये बिबट हा मृतावस्थेत आढळला, त्यामुळे घरी येऊन देशमुख यांना बिबट मरून असल्याचे सांगितले, सांयकाळी देशमुख यांनी विलंब न करता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे वनविभागाला कळविले, त्यामुळे रात्री तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याहाड येथील क्षेत्र सहाय्यक रवी सूर्यवंशी, वनरक्षक मेश्राम, सोनेकर, प्रत्यक्ष पाहणी करून शवविच्छेदन साठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले, यावेळी वण्परिक्षेत्र अधिकारी कामडी यानी झुंज मधे मृत्यू झाला असा अंदाज वर्तविला आहे मात्र शवविच्छेदन नंतर पूर्ण माहिती मिळेल .यावेळी पुनम झाडे, भैयाजी देशमुख, ढिवरू चिमुरकर, यशवंत बारसागडे आदी उपस्थित होते.

सुनील तायडे

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!