Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsसुपर कॉपचा तडाखा! २७१ ग्रॅम ड्रग्स जप्त, तस्करांचे धाबे दणाणले!"गुन्हेगारांनो सावधान, 'सुपर...

सुपर कॉपचा तडाखा! २७१ ग्रॅम ड्रग्स जप्त, तस्करांचे धाबे दणाणले!”गुन्हेगारांनो सावधान, ‘सुपर स्ट्रायकर’ मैदानात!”

वर्धा पोलिसांची दणकेबाज कारवाई, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची विशेष मोहीम 

चंद्रपूर नंतर हिंगणघाट-बुटीबोरीत पोलिसांचा थरार; ‘सुपर स्ट्रायकर’ सुशीलकुमार नायक यांची दणकेबाज कारवाई! 

नागपूर/वर्धा/चंद्रपूर –(सुशांत घाटे )

विदर्भात फोफावलेल्या एम.डी. (MD) ड्रग्सच्या विळख्यावर आता पोलिसांनी आपला ‘हंटर’ चालवण्यास सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने १०१ ग्रॅम एम.डी. साठा जप्त केल्यानंतर, त्याच रात्री वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणून सोडले आहेत.वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या विशेष मोहिमेतून ड्रग्स सारख्या  रॅकेट ला चालवाणाऱ्या गुन्हेगारा वर विशेष मोहीम राबवण्यात आली आहे.

​⚡ मध्यरात्रीचा थरार: २७१ ग्रॅम एम.डी. जप्त!

​चंद्रपूरच्या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्कर सावध होतील असे वाटत असतानाच, ‘सुपर स्ट्रायकर’ म्हणून ओळखले जाणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि त्यांच्या पथकाने गनिमी काव्याने हिंगणघाट आणि बुटीबोरी परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल २७१ ग्रॅम एम.डी. ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे.

सहा आरोपी जेरबंद; तस्करांचे धाबे दणाणले

​हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि त्यांच्या चमुने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. आतापर्यंत या प्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे ड्रग्स विक्रेत्यांनी पळ काढला आहे. नागपूरमधून विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पसरत असलेल्या या ड्रग्जच्या जाळ्याला सुरुंग लावण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे.

​🛡️ ‘सुपर स्ट्रायकर’ सुशीलकुमार नायक यांचा धडाका 

​चंद्रपूर, वणी आणि नांदेडनंतर आता हिंगणघाट विभागात सुशीलकुमार नायक यांनी गुन्हेगारांवर आपला वचक निर्माण केला आहे. अवैध दारू विक्री असो वा अमली पदार्थांची तस्करी, माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता ते ‘सुपर स्ट्रायकर’प्रमाणे मैदानावर उतरतात.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!