🔥 BREAKING: चंद्रपुरात एलसीबीचा थरार; आंतरराज्य ‘ड्रग्ज’ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
वरोरा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १०० ग्रॅम एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद
चंद्रपूर -7मे 2026
चंद्रपूर जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या एका ‘ड्रग्ज रॅकेट’चा एलसीबीने पर्दाफाश केला असून, वरोरा परिसरात सापळा रचून तब्बल १०० ग्रॅम एमडी (Mephedrone) ड्रग्जसह आंतरराज्य तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत
अशी झाली ‘धडक’ कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूरमार्गे एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप चंद्रपूर जिल्ह्यात आणली जात आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने नागपूर -चंद्रपूर शहरात हायवेवर घेराबंदी केली.वरोरा येथें संशयास्पद वाहन येताच त्याला अडवून झडती घेतली असता, पोलिसांना त्यात उच्च दर्जाचे ‘एमडी’ ड्रग्ज मिळून आले.
“जिल्ह्यातील तरुण पिढीला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या रॅकेटचा कणा मोडण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्य स्तरावर पसरलेले असून अधिक तपास सुरू आहे.”
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

