चंद्रपूर /अमरावती: (सुशांत घाटे)
वर्ध्यातील त्या मोठ्या धडाक्यानंतर आता विदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) आपला मोर्चा अमरावतीकडे वळवला आहे. शहराच्या मध्यवस्तीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या या धाडसी कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
💉 ५ कोटींचे ‘मफेड्रॉन’ जप्त; ४ तस्कर जाळ्यात!
दिल्लीहून आलेल्या DRI च्या विशेष पथकाने अत्यंत गुप्तपणे ही मोहीम फत्ते केली. अमरावतीमधील गवळीपुरा आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत तब्बल ५ कोटी रुपये किमतीचे ‘मफेड्रॉन’ (MD) ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून, या रॅकेटशी संबंधित ४ मुख्य आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
🔥 अमरावती पोलिसांना DRI चा ‘दणका’
ही कारवाई केवळ ड्रग्ज जप्तीपुरती मर्यादित नसून, स्थानिक प्रशासनासाठी एक मोठी चपराक मानली जात आहे.
स्थानिक पोलिसांना खबरही नाही: स्थानिक पोलीस झोपेत असताना दिल्लीच्या पथकाने शहरात येऊन इतका मोठा साठा पकडला.
नाकावर टिचून कारवाई: पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ड्रग्जचा काळाबाजार सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला याचा पत्ता कसा लागला नाही? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह: शहरात ड्रग्जचे: जाळे इतके खोलवर पसरले असताना स्थानिक यंत्रणा हतबल का?
📍 कारवाईचा घटनाक्रम
गोपनीय माहिती: दिल्ली DRI ला अमरावतीत ड्रग्जची मोठी खेप येणार असल्याची पक्की माहिती मिळाली होती.
मध्यरात्री छापे: काल रात्रीपासूनच पथकाने संशयास्पद ठिकाणांना वेढा घातला.
नागपुरी गेट परिसरात थरार: गवळीपुरा आणि परिसरात शोधमोहीम राबवून मुद्देमाल आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
”वर्ध्यातील कारवाईनंतर विदर्भातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आता थेट दिल्लीशी जोडले गेल्याने शहरात आणखी कोणाचे संरक्षण या तस्करांना होते, याचा तपास सुरू झाला आहे.”
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

