Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsभ्रष्टाचार करा आणी लॉटरी मिळवा? थोरात क्रिम पोस्टिंग ला!

भ्रष्टाचार करा आणी लॉटरी मिळवा? थोरात क्रिम पोस्टिंग ला!

चंद्रपूर -(31 मे 2025)
सुशांत घाटे
🔅🔅🔅🔅🔅🔅
👉राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या कितीतरी कथा डेली पोस्टमार्टम नी पुराव्यासह प्रसारित केल्या आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला लागलेल्या यां विभागाला भ्रष्टाचाराचे ग्रहण जनू चमडी वरची सोललेली खाल च वाटाला लागू लागलेली आहे.

डेली पोस्टमार्टम नी या बाबतीत आवाज उचलताच सध्या तरी राज्य उत्पादन विभागातील काही भ्रष्टखोर अधिकारी हुबकून दडी मारून वसुली गुरग्या सोबत नवीन योजनेचा मार्ग शोधू लागले आहे.

महिन्या काठी वसुलीची लागलेली कीड यां भ्रष्टखोरांना जनू झोपेची दिलेली गोळी च म्हणावी लागेल. वसुली शिवाय या भ्रष्टखोर अधिकाऱ्यांना झोपच येत नाही?हफ्ता वसुली साठी इकडून तिकडे काही लाचखोर अधिकारी करवट देऊन राहले आहे.आरोपांच्या फैरीतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या? एकाला मलाईदार पोस्टिंग तर दुसरा दिव्याला पाती नसणाऱ्या ठिकाणी?

🔅राज्य उत्पादन शुल्क विभागातील काल बदल्यांची यादी आली त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दोन निरीक्षक अधिकाऱ्यांची मुंबई आणी बुलढाणा या ठिकाणी बदली झाली.
चंद्रपूर जिल्ह्यात भ्रष्टाचार करण्यात अव्वल वस्ताद असणाऱ्या निरीक्षक विकास बबन थोरात ला मलाईदार क्रिम बेल्ट भेटल्याच्या चर्चेला राज्य उत्पादन शुल्क विभागातील चर्चेला उधाण आले आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या फैरीत असणाऱ्या या अधिकाऱ्याला भक्कम पाठबळ कोणत्या आर्थिक राशी नी लाभवले याची दृतगती चर्चा चंद्रपूर टू मुंबई पर्यंत पोहचली आहे. करोडो चा भ्रष्टाचार ठोकून महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील अश्या पोस्टिंग जर वाटल्या जात असतील तर भ्रष्टाचाराचे लायसन्स च खुले करून टाकावे अशी चर्चा आता जनमाणसात सुरु आहे.

वरोरा येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विकास बबन थोरात यांची निरीक्षक, पी विभाग, मुंबई उपनगर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

🍁मुंबई तील पी विभाग म्हणजे लॉटरी?

🔅🔅मुंबईतील पी विभाग साठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनेकांची पसंती नंबर एक वर असते त्यातच विकास बबन थोरात यांना ही पसंती कोणत्या कामासाठी बहाल झाली याची शोध पत्रकारिता डेली पोस्टमार्टम लवकरच शोधून काढणार आहे.

👉काय आहे पी विभाग मुंबई उपनगर..

🏵️मुंबईतील सर्वात हॉट म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागातील मलाईदार एरिया म्हणून याची ओळख आहे.
यां डिव्हिजन मध्ये सर्वात रिहा्यशी क्लब, डिस्कोथेट, भक्कम परमिट बार आणी क्रिम विथ मलाई म्हणून महिन्याला 66 L चा पॅकेज रोल कॉल म्हणून निरीक्षक यांची खास ओळख आहे. यां विभागातील टाटा कॉलनी, मुंबई च्या मिठी नदीच्या पूर्वेकडील क्षेत्र, बांद्रा कुर्ला, कॉम्प्लेक्स, पश्चिम दृतगती मार्ग यां सोबतच BKC पोलीस स्टेशन, खेरवाडी पोलीस स्टेशन, निर्मल नगर पोलीस स्टेशन, वाकोला पोलीस स्टेशन, विलेपार्ले पोलीस स्टेशन, व विमानतळ पोलीस स्टेशन अश्या पोलीस स्टेशन च्या हद्दीतील ठिकाणी विकास बबन थोरात ची क्रिम पोस्टिंग झाल्याने अनेक चांगल्या अधिकाऱ्यांनी यां मागचे गूढ काय त्याचा शोध सुरु केला आहे? यां विभागात P-1,P-2,P-3 अश्या तीन दुय्यम निरीक्षक अधिकाऱ्यांची निरीक्षक विकास थोरात ला साथ लाभणार आहे. भ्रष्टाचाराच्या कैचीतला थोरात आता प्रायव्हेट मॅन शेलार च्या मार्फत मुंबईत वसुलीत वरात तर नाही काढणार यां कडे सर्वांचे लक्ष लागले आहे?

डेली पोस्टमार्टम या बाबतीत मागोवा नक्कीच घेणार आहे.
तर दुसरीकडे चंद्रपूर भरारी पथकाचे ईश्वर वाघ यांची बुलढाणा येथे निरीक्षक पदावर वर्णी लागली आहे. त्यांची आधी वरोरा येथे निरीक्षक पदावर डोळा होता मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वातावरणात बदल पाहुण त्यांनी आपला मूड बदलवत वेगळ्याच ठिकाणी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. मात्र मध्येच पावसाने यां चुलीवर विरजण घातल्याने त्यांना धक्काचं बसला. ज्या ठिकाणी प्रयत्न केले त्यां ठिकाणी न भेटता त्यांना बिन पात्याच्या दिव्याला चिकटवण्यात आले. भरारी घेताना त्यांची करारी थट्टा झाली असल्याची चर्चा सध्या अंतर्गत वर्तुळात सुरु आहे.

🍁लवकरच जनहित याचिका दाखल होणार!
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराला शिगेला पोहचवणाऱ्या सर्व भ्रष्ट खोरांची पोलखोल घेऊन उच्च न्यायालयात यां विषयी PIL दाखल करण्यात येणार आहे.
गैरव्यवहार, लाचखोरी, अनियमितता, भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वांची यादी तैयार झाली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!