चंद्रपूर –21 मे 2025
(सुशांत घाटे)
⚽राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराच्या खेळीचा डेली पोस्टमार्टम ने उलगडा करताच,वसुलीसाठी नियुक्त केलेले खाजगी गुर्गे बिळात लपून बसलेले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वसुलीची जवाबदारी स्वीकारणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील वसुली फन्टरांनी डेली पोस्ट मार्टम च्या दणक्याने सध्या नॉट रिचेबल चा फार्मुला स्वीकारला आहे.
राज्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा डंका भ्रष्टाचाराच्या संदर्भात वाजत असल्याने त्याची वरिष्ठ पातळी वरून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
डेली पोस्ट मार्टम ने धक्कादायक खुलासे केल्या नंतर प्रशासन यंत्रणा ही हादरून गेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या संदर्भात चौकशी सुद्धा लावली आहे.
💢राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी सुद्धा त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढल्याने भ्रष्टाचाराच्या सानिध्यात असलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
वरोरा सर्कल चे निरीक्षक विकास बबन थोरात, राजुरा सर्कल चे निरीक्षक अभिनंदन कांबले, तसेच भरारी पथकाचे ईश्वर वाघ सध्या या कारवाईच्या जाळ्यात अडकले आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तसेच खाजगी वसुली एजन्ट ची लांबलचक यादी च डेली पोस्ट मार्टम च्या हाती आली आहे. करोडो रुपयाची हफ्तेखोरीत हा विभाग सध्या टॉप वन वर असल्याचे बोलल्या जात आहे. तर तिकडे डेली पोस्टमार्टम च्या दणक्याने हादरून बसलेल्या अधिकाऱ्यांची गोची निर्माण झाली आहे.
अभिजित लिचडे, संदीप राऊत, राजवटे, दारोडे, किशोर डोंगरे, जगदीश म्हस्के आणि इतर ही अधिकाऱ्यांची लवकरच डेली पोस्टमार्टम वसुली संदर्भात यादीसहित लवकरच खुलासा करणार आहे.
⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽⚽
नोट – लायसन्स धारकांनो जर आपल्याला राज्य उत्पादन शुल्क विभागातील कोणताही अधिकारी किंव्हा खाजगी इसम लाच मागत असेल तर डेली पोस्ट मार्टम ला कळवा… डेली पोस्ट मार्टम आपली आवाज लाचलूचपत प्रतिबंधक च्या वरिष्ठ पातळीवर पोहचवणार……..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


