Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsबदल्यांचे रेटकार्ड चा गोप्यस्फोट... 60 हजार ते 10 कोटी पर्यंत होते टास्क..

बदल्यांचे रेटकार्ड चा गोप्यस्फोट… 60 हजार ते 10 कोटी पर्यंत होते टास्क..

धनंजय मुंडेंचे होते बदल्यांचे रेटकार्ड !

सुरेश धस यांनी केला गौप्यस्फोट, मुंडेचे दरपत्रकच केले जाहीर..

बीड(21 फरवरी) : धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असतानाच्या काळात बदली, पदोन्नती पैसे घेऊन केल्या जात होत्या. त्याचे पदानुसार रेटकार्डच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गुरूवारी जाहीर केले. अगदी ६० हजार रुपयांपासून पैसे घेतले जात होते. सर्वात जास्त १० कोटी रूपये हा दर पुण्याच्या संचालक गुणनियंत्रण आयुक्त कार्यालय या पदाचा होता. बदल्या करताना नागरी सेवा अधिनियमाचे पालन न केल्याचा आरोप आ.सुरेश धस यांनी केला आहे.

👇पहा कुठल्या पदासाठी कुठला दरपत्रक..

 

कृषी सहायक

६० हजार

कृषी पर्यवेक्षक

१ लाख ५० हजार

कृषी अधिकारी

३ लाख

क्षेत्रीय मंडळ अधिकारी

२ लाख

कार्यालयीन कृषी अधिकारी

२ लाख

तालुका कृषी अधिकारी

५ लाख

तंत्र अधिकारी

४ लाख

उपविभागीय कृषी अधिकारी

७ लाख

कृषी उपसंचालक

५ लाख

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

९ ते ३० लाख

विभागीय कृषी संचालक (ठाणे विभाग)

८० लाख

विभागीय कृषी संचालक (पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर) ६० लाख

विभागीय कृषी संचालक (अमरावती, नागपूर)

४० लाख

संचालक गुणनियंत्रण कृषी आयुक्त पुणे

१० कोटी

मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, पुणे

२ कोटी

कृषी उपसंचालक, खते

१ कोटी

मुख्य निरीक्षक बियाणे

५० लाख

कृषी अधिकारी गुणनियंत्रण

1 कोटी 

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण

२ कोटी

कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्यांतर्गत)

६० लाख

कृषी अधिकारी कीटकनाशके (राज्याबाहेर)

८० लाख

तंत्र अधिकारी बियाणे

४० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (अमरावती-२)

५० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (पुणे-२)

७० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (ठाणे-५)

१ कोटी

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (नाशिक-३, लातूर-२, कोल्हापूर-२) ८० लाख

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (छत्रपती संभाजीनगर)

१ कोटी

तंत्र अधिकारी गुणनियंत्रण (नागपूर-१) ३० लाख

विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पुणे विभाग) १ कोटी

विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पुणे जिल्हा) ८० लाख

विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (अहिल्यानगर, सोलापूर) ६० लाख

विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (कोल्हापूर)

६० लाख 

(इतर जिल्ह्याच्या विभागीय,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकासाठी पाच लाख रुपयापासून ते 60 लाख रुपयापर्यंत  दर आकरण्यात येत होता.)

धस यांनी यापूर्वी कृषी विभागातील अनेक घोटाळे उघड केले होते. तसेच पीक विमा घोटाळाही त्यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. आता गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे कृषिमंत्री असतानाचे अनेक घोटाळे समोर आणले. यासोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीचा मुद्दाही चव्हाट्यावर आणला. कशाप्रकारे नियमबाह्य बदल्या करून पैसे घेऊन पदस्थापना दिली जात होती हे मांडले. धस यांनी अधिकारी, कर्मचारी अशा ७५ जणांच्या नावासह रेटकार्ड जाहीर करून माध्यमांनाही दिले. भांबरे, पवार, कराड या अधिकाऱ्यांसह स्वतः धनंजय मुंडे यांच्या खिशात हे पैसे गेल्याचा आरोपही धस यांनी केला.

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!