चंद्रपूर
8 सप्टेंबर 2024
💥जिल्ह्यातील अवैध हत्यार चा साठा कीती असेल हे आता स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि स्थानिक पोलिसांच्या आतापर्यंत झालेल्या कारवाई तुन दिसून येत आहे.👉आज संडे स्पेशल करीत सलग चौथ्या दिवशी ही LCB नी कारवाई केली आहे.
✨चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत रेकॉर्ड वरील गुन्हेगाराच्या घर झडतीत गोपनीय माहिती च्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तलवारीसह हनुमंत विठ्ठल कुसळे या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गडचांदूर येथून अटक केली आहे.
✨✨✨✨✨
👉पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची जिल्ह्यातील गणेश उत्साह दरम्यान कुठलीही अनुचित गुन्हेगारी ची घटना होऊ नये तसेच भयमुक्त वातावरण राहावं यासाठी त्यांची संकल्पना आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीला वेसण टाकून कायद्यात ठेवण्याचा दृष्टीने ते प्रयत्नरत आहे.जिल्ह्यातील आतापर्यंत 25 च्या जवळपास अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात LCB चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्वामींदास चालेकर, धनराज करकडे, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


