चंद्रपूर /भंडारा –
5 सप्टेंबर 2024
सुशांत घाटे –
✨काही दिवसा अगोदर डेली पोस्टमार्टम ने नेटवर्क मार्केटिंग स्कीम च्या आड फसवे गिरीचा डाव रचनाऱ्या आय बिल्ट कंपनी संदर्भात चे वृत्त प्रकाशित केले होते.
👉याच प्रकारच्या अश्या अनेक कंपनी मध्ये कितीतरी लोकांनी पैशांची दुप्पट रक्कम होईल च्या प्रलोभनातून गुंतवणूक केल्याचे उजेडात आले असताना,
भंडारा पोलिसांनी फसवेगीरी करणाऱ्या “माय सेक्युर लाईफ” या कंपनीच्या मुंबई, ठाणे आणि गोंदिया जिल्ह्यातील तीन भामट्या विरोधात पवनी पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद केला आहे.👉या कंपनी ने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, येथे आपल्या नेटवर्क मार्केटिंग चे जाळे विणत जर कंपनी मध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास दर हफ्त्याला ( 7 दिवसामध्ये )कंपनी संबंधित रकमेवर 10% देईल तसेच मुंबई ते मडगांव (गोवा )क्रूझ चे पॅकेज देईल असे सांगत मोठ्या प्रमाणात या कंपनी ने नागरिकांची फसवणूक केली आहे.
🎗️🎗️
भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील प्रवीण मुंडले नावाच्या व्यक्तीने माय सेक्युअर लाईफ कंपनी नी 13,25,500 रुपयाचा आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पवनी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली.
पोलिसांनी या बाबत लगेच दखल घेत तात्काळ गुन्हा नोंदवत आरोपीनचा शोध घेणे सुरु केले आहे.
कंपनी मध्ये अनिल गणपत चौधरी उर्फ ओमकार सावंत, मुंबई उमेश जाधव, ठाणे राजेश रमेश रहागंडाले, चिंचगाव, गोंदिया या तिन्ही ही व्यक्तीविरोधात कलम 420,406,34भा. द. वि. 21,22 बेकायदेशीर ठेव अधिनियम 2019 सहकलम 3 महाराष्ट्र अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

