Saturday, June 6, 2026
HomeBreaking NewsLCB च्या एकाच दिवशी दोन जुगार अड्ड्यावर धाड!पोलीस अधीक्षकांचे सुदर्शन चक्र...

LCB च्या एकाच दिवशी दोन जुगार अड्ड्यावर धाड!पोलीस अधीक्षकांचे सुदर्शन चक्र…

चंद्रपूर -4सप्टेंबर

दोन जुगार अड्डयावर LCB ची धाड ‼️

✨जिल्ह्यातील जुगारावर धाडसत्र सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत विठ्ठल मंदीर परिसरात सुरु असलेल्या जुगाराच्या डावा वर धाड मारीत नव जुगार बहादूरांना अटक केली आहे. काही जुगारी पळाले मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत नव जुगारी अडकले. या जुगारामध्ये वसंत महादेव येलमुले, अरुण पंजाबराव घुमडे, विश्वास रामचंद्र पडगीलवार, प्रशांत श्रावण गाडगीलवार, राहुल बाळकृष्ण आंबीरवर, गिरीश केशव खडसे, कुणाल यशवंत गर्गेलवार, आकाश राजे चौधरी, सुभाष जगदीश जोशी या आरोपीनचा जुगारामध्ये समावेश आहे. यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शहर येथे अपराध क्रमांक 24कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपीना पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, रजनीकांत पुट्टेवार, किशोर वैरागडे, सतीश अवतरे, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, संतोष येल पुलवार यांनी केली आहे.

दुसऱ्या जुगारामध्ये 8अटकेत लाखोचा मुद्देमाल सहित रोख रक्कम जब्त ‼️

जुगाराची दुसरी ही कारवाई रात्रीच..

✨✨✨✨
👉 रात्रीदरम्यान लालपेठ जंगल परिसर, पोस्टे चंद्रपूर शहर येथे छापा टाकून जुगार कारवाई केली. सदर गुन्ह्यात एकूण 08 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपी फरार आहेत. सदर जुगाअड्ड्यावर आरोपीकडून जुगाराचे 1,65,900/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींचे नावे :-

1. माधव उर्फ मुन्ना रामप्रसाद मिश्रा रा. बाबपेठ वार्ड चंद्रपूर,
2. देवेंद्र सिंग अवतरसिंग गील रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर,
3. नसिमदिन वाशिर्दीन शेख रा. बिंबा. गेट चंद्रपूर,
4.अश्फाक मुस्ताक शेख रा. कृष्णानगर चंद्रपूर,
5.विपुल संभाजी अत्राम रा. बाबुपेठ चंद्रपूर,
6.श्रीनिवास चंद्रय्या उसुमा रा. लालपेठ चंद्रपूर,
7.फिरोजखान अनिसखान पठाण रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर
8.आवेश सुरेश इंचलवार रा. लालपेठ, चंद्रपूर

पाहिजे आरोपी :-

1) धनराज सावरकर, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर

कारवाई पथक:-
पोउपनी. विनोद भूरले, पोहवा. रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवतरे, किशोर वैरागडे, पोशी.गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!