Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, सहित सहा जणांविरोधात खंडणी, खोटं...

महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, सहित सहा जणांविरोधात खंडणी, खोटं दस्त ऐवजांची निर्मिती आणि वापर आणि इतर विविध गुन्हे दाखल!

ठाणे ✨(28 ऑगस्ट )
सुशांत घाटे –

✨✨✨✨
महाराष्ट्र चे माजी पोलीस महासंचालक(डीजी)
संजय पांडे आणि अन्य सहा जणाविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य या आरोपांनवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात 26 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

✨✨✨✨काय आहे तक्रार!

👉मुंबईतील व्यावसायिक पुनामिया यांनी तक्रारी मध्ये म्हटले की, मे 2021ते 30जून 2024 या कालावधीत यातील कथित आरोपिंकडून आपण त्रास सहन केला. राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचा या मध्ये समावेश असल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार ठाणे नगर पोलिसांकडे 2016 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. पैसेही उकळले आहेत.

💥 गुन्ह्यामध्ये पोलिसांनी लावलेल्या कलमा!

166(अ)आणि 170,120(बी), 193,195,199,203,
205आणि 209,352आणि 355,384,389,465,
466आणि 471(खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर )

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!