Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsगोवंश तसकरांनी बॅरीकेट उडवले!पोलिसांचा फिल्मी पाठलाग... करोडो चा मुद्देमाल जब्त!

गोवंश तसकरांनी बॅरीकेट उडवले!पोलिसांचा फिल्मी पाठलाग… करोडो चा मुद्देमाल जब्त!

चंद्रपूर -8 ऑगस्ट
गोवंश तस्करी वर चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाला सक्त आळा घालण्याच्या सूचना देत,पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन

हे अलर्ट मोड वर असताना आज गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतुन गोवंश तस्करीचे तीन अशोक लिल्यान्ड कंपनीचे ट्रक गोवंश घेऊन कत्तल खाण्याकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी सीमेवर नाकाबंदी करीत बॅरीकेट लावले होते.
मात्र गोवंश तसकरांना पोलीस दिसताच त्यांनी गाडी चा वेग वाढवत बॅरीकेट उडवत धूम ठोकली, लगेच गोंडपिपरी पोलिसांनी याची माहिती कोठारी पोलिसांना देत बंदोबस्त लावला असता, कोठारी पोलिसांनी रस्त्यावरती ट्रक आडवे लावून तिन्ही ही ट्रकांना कोठारी जवळ जनावरा सहीत पकडले आहे. दोन ट्रक मधील आरोपी ट्रक उभे करून पसार झाले मात्र एका ट्रक मधील दोन आरोपीना गोंडपिपरी पोलिसांना पकडण्यात यश आले. गेल्या दोन दिवसात पाच ट्रक गोवंश तस्करीचे पकडण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस दला ने  पकडल्याने तसकरांचे धाबे दणानले आहे. करोडो रुपयाच्या मुद्देमाल जब्त करीत गोवंशाची सुटका करण्यात आली आहे.

आतापर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व त्याच्या गुन्हे शाखेने तब्बल जनावर तस्करीचे 54 गुन्हे दाखल करीत 144 आरोपीना अटक केली आहे. जवळपास 71 वाहन जब्त करीत आठ करोड सत्तावीस लाख रुपये लक्षाचा मुद्देमाल सुद्धा ताब्यात घेतला आहे. गोमास विक्री चे सुद्धा 8 गुन्हे दाखल करीत 16 आरोपीना जेरबंद करीत त्यांच्याकडून सुद्धा 81 लक्ष रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पोलीस प्रशासना ने जब्त केला आहे.

‼️‼️‼️‼️‼️

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!