Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsकायद्याचे रक्षक गेले कुठे? सर्रास दिवसा अवैध दारू विक्री च्या पेट्या चा...

कायद्याचे रक्षक गेले कुठे? सर्रास दिवसा अवैध दारू विक्री च्या पेट्या चा डावरा वाईन शॉप मधून महापूर?

चंद्रपूर 4 ऑगस्ट

सुशांत घाटे –

“अवैध दारू” विक्रीला आळा घालताय की त्याला पांघरून संरक्षण देता? हा मोठा प्रश्न राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित पोलीस विभागातील अंतर्गत वर्तुळात आता उपस्थित झाला आहे.

👉चंद्रपूर शहरातील तुकूम –
दुर्गापूर रोड वरील” डावरा वाईन शॉप “या ठिकाणाहून सर्रास देशी – विदेशी दारू ची चारचाकी – दुचाकी ने मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करीत असताना संबंधित विभागाचा आर्थिक आशीर्वाद ने याचे चांगलेच फावले असल्याचे दिसत आहे?

👇
काल तीन ऑगस्ट रोजी चक्क एक मारुती वॅन मध्ये दुपारी तीन वाजता च्या सुमारास डावरा वाईन शॉप मधून सरळ त्याच्या गोडावून ला लावून,देशी दारूच्या पेट्या या गाडीत भरीत ग्रामीण भागात अवैध विक्री ला नेत असताना आढळून आले. संबंधित विभागाला या संदर्भात माहिती तसेच पुरावा सुद्धा देण्यात आला मात्र तो पर्यंत ते चारचाकी वाहन देशी दारू चा साठा घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाला.

filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0;
hw-remosaic: 0;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: Night;
cct_value: 0;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 0.0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;

👉अवैध दारू विक्रीला फक्त कागदावर च आळा घालायचा का? हा मोठा भेदक प्रश्न आता निर्माण झाला आहे. इतक्या दिवसा ढवळ्या सर्रास रोड वरती या वाईन शॉप चालकाची हिम्मत  अवैध दारू विक्री ला जर करीत असेल तर कायद्याचा धाक कुठे उरला?

👉हा प्रश्न सामान्य जनता त्या कायद्याच्या “रक्षकांना “विचारत आहे. रोज जवळपास 200 पेटी च्या वर या वाईन शॉप मधून अवैध दारू विक्रीचा फार्मुला ग्रामीण भागात पुरवत जात असल्याची विश्वसनीय माहिती डेली पोस्टमार्टम ला मिळाली आहे.
संबंधित विभाग आता काय कारवाई करणार हे बघणे कौतुकाचे आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!