Monday, April 20, 2026
HomeBreaking Newsपकडला रे मुख्य आरोपी सुरज गुप्ता, बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब आणि दीड वर्षांपासून...

पकडला रे मुख्य आरोपी सुरज गुप्ता, बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब आणि दीड वर्षांपासून फरार आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी नागपुरात ठोकल्या बेड्या!

चंद्रपूर  3 ऑगस्ट

सुशांत घाटे

– बल्लारपूर मधला दीड वर्षांपासून फरार असलेल्या आणि बल्लारपूर येथील चर्चित पेट्रोल बॉम्ब प्रकरनाचा मुख्य मोस्ट वॉन्टेड आरोपी सुरज  संतोष गुप्ता ला बल्लारपूर च्या ठाणेदार आणि त्यांच्या पथकानी नागपूरातील धरमपेठ परिसरातुन अटक केली आहे.

💥पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देणारा हा कुख्यात गुन्हेगाराच्या मास्टर माईंड ने पूर्ण बल्लारपूर शहर हादरून गेले असताना त्या विषयी मोठ्या प्रमाणात गाजावाजा, राजकीय पक्षांनी पोलीस प्रशासना विरोधात केला होता. मात्र पोलीस प्रशासनाची यंत्रणा ही सतत गुन्हेगाराच्या डावपेच्यावर असताना त्याला आज बल्लारपूर पोलिसांनी सिद्ध करुन दाखवत बल्लारपूर प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवरल्या आहे.

💥बल्लारपूर मधली गुन्हेगारी ला पूर्णतः वीराम लावण्यात नेहमी तत्परतने दिवस रात्र एक करीत प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्याला काही राजकीय व्यक्तीनी,टार्गेट करीत द्वेष आखला होता मात्र पोलीस अधीक्षक यांनी विश्वास दाखवत त्या अधिकाऱ्याला काम करण्याची संधी दिली.

  • त्यांच्या प्रतिउत्तरात बल्लारपूर पोलिसांनी उत्तम कामगिरी करीत मुख्य आरोपीला कैदीत घेतले आहे. पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर असताना त्याला थेट आता बल्लारपूर पोलिसांची कारवाई ही प्रमुखता चा विषय ठरला आहे.
    या कारवाईचे पूर्णतः लक्ष ठेवून असणारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, पोलीस हवालदार गजानन डोईफोडे, मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले आहे. इतर

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!