चंद्रपूर 3 ऑगस्ट
– शिवसेना(UBT) च्या पदाधिकाऱ्याला शहर पोलिसांनी शस्त्रासह अटक करत रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शहर पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना काल रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की, शिवेसेना चे पदाधिकारी विक्रांत सहारे हे चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातून दोन युवकांकडून अग्नीशस्त्र विकत घेणार आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा चे महेश कोंडावार यांचे ठिक ठीक ठिकाणी आरोपीच्या मागावर पथक लावण्यात आले होते.शहर पोलीस आणि रामनगर पोलिसांनी जॉईंट ऑपरेशन करीत गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेत एक मॅग्जीन, चाळीस जिवंत काडतूस, तलवार, वाघ नख,बेस बाल बॅट जप्त करीत विक्रांत सहारे याला ताब्यात घेतल्याने राजकीय क्षेत्रातील धाबे दणानले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई ने जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेला चांगलाच मोठा धक्का बसला आहे. पुढील कारवाई रामनगर पोलीस करीत असून त्याच्या मुळापर्यंत तपास करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी डेली पोस्टमार्टम ला सांगितले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

