Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsचंद्रपुरात IPL सट्ट्याचा 'रक्ताळलेला' बाजार! ४०० बुकींचा जिल्ह्यात तांडव; तेलंगणा कनेक्शनसह 'नाईस'...

चंद्रपुरात IPL सट्ट्याचा ‘रक्ताळलेला’ बाजार! ४०० बुकींचा जिल्ह्यात तांडव; तेलंगणा कनेक्शनसह ‘नाईस’ आयडीचा महाघोटाळा! यश च्या नावाने पुन्हा नाईस क्रिकेट आयडी वर आगमन! आसिफ, आशिष सहित नंबरी बुकी सक्रिय

चंद्रपुरात IPL सट्ट्याचा ‘रक्ताळलेला’ बाजार! ४०० बुकींचा जिल्ह्यात तांडव; तेलंगणा कनेक्शनसह ‘नाईस’ आयडीचा महाघोटाळा! यश च्या नावाने पुन्हा नाईस क्रिकेट आयडी वर आगमन! 
​
​(चंद्रपूर:सुशांत घाटे )

मैदानावर जेव्हा एखादा फलंदाज चौकार किंवा षटकार मारतो, तेव्हा चंद्रपूरच्या एखाद्या फार्म हाऊसमध्ये किंवा आलिशान ‘ओयो’ हॉटेलच्या बंद खोलीत करोडोंची उलाढाल होत असते. चंद्रपूर जिल्हा सध्या गुन्हेगारीच्या एका अशा वळणावर उभा आहे, जिथे खेळापेक्षा सट्टेबाजीचा ‘खेळ’ अधिक जीवघेणा ठरत आहे. आयपीएलच्या नावाखाली सुरू असलेला हा सट्टा केवळ जुगार उरलेला नसून, तो एका मोठ्या आंतरराज्यीय गुन्हेगारी सिंडिकेटचा भाग बनला आहे.

तेलंगणापासून आंध्रप्रदेशपर्यंत आणि गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत या बुकींची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की, आता सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे.

 ​🏢 सट्टेबाजीची ‘मंत्रालये’: फार्म हाऊस आणि रिसॉर्ट्स बनले अड्डे

​चंद्रपूर जिल्ह्यातील शांतता भंग करण्यासाठी बाहेरून आलेल्या बुकींनी इथल्या फार्म हाऊस आणि रिसॉर्ट्सना आपले ‘कमांड सेंटर’ बनवले आहे.   यांसारखी मोठी नावे सध्या या सट्टेबाजीच्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट बनून मिरवत आहेत. कधी दाताळा मार्गावरील निर्जन फार्म हाऊस, तर कधी शहरातील छुप्या ओयो हॉटेल्समध्ये लॅपटॉप, मोबाईलच्या रांगा आणि पैशांच्या थप्प्यांच्या सोबतीने हा काळा बाजार चालतो.
​आसिफ आणि आशिष यांची कार्यकीर्द पाहता, त्यांनी जठपुरा, नगीनाबाग आणि पठाणपुरा सारख्या गजबजलेल्या भागांत सट्टेबाजीचा ‘मुक्त संचार’ सुरू केला आहे. या बुकींनी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतकी अचूक वापरली आहे की, पोलिसांचा छापा पडण्यापूर्वीच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसार होतात.

 💢तेलंगणाचे ‘साम्राज्य’ आणि अहेरीचे ‘कनेक्शन’यावेळच्या आयपीएलमध्ये चंद्रपुरात केवळ स्थानिक बुकी नाहीत, तर तेलंगणा राज्यातील रसूल आणि संतोष यांसारख्या सट्टेबाजांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. आसिफाबाद, आदिलाबाद आणि विजयवाडा येथील एजंट्सनी चंद्रपूर जिल्ह्याला आपली ‘सुरक्षित कर्मभूमी’ मानले आहे. नुकताच अहेरी येथील एक फंटर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) हाती लागला, ज्याने या साखळीचे धागेदोरे उघड केले. इरफान नावाच्या अहेरीच्या बुकीवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या सिंडिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, तरीही या बुकींची ‘दिलासा’ मिळवण्याची शक्ती कायद्यापेक्षा मोठी ठरत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

💢: ‘NICE’ आयडीचा फास: शेकडो घरे चव्हाट्यावर!

​या सट्टेबाजीच्या सर्वात भयानक पैलू म्हणजे ‘Nice.777.com’ ते आताच्या ‘YASH’ आयडीपर्यंतचा प्रवास. सुरुवातीला ‘नाईस’ कंपनीने विश्वास संपादन केला आणि नंतर आयडी बदलून, नियम बदलून हजारो कुटुंबांना कर्जबाजारी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो तरुण आणि मध्यमवर्गीय व्यक्तींनी या ॲपच्या नादात आपली वडिलोपार्जित संपत्ती, दागिने आणि घरे गमावली आहेत.
​या ‘नाईस’ कंपनीचे कर्तेधर्ते इतके हुशार आहेत की, त्यांनी या हंगामात अर्ध्या डावातच ‘गेम’ फिरवून सट्टेबाजांना कंगाल केले आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या. ही निव्वळ सट्टेबाजी नसून हा एक आर्थिक ‘डिजिटल दहशतवाद’ आहे, ज्याने चंद्रपूरच्या घराघरांत अश्रू पोहचवले आहेत.

🌻 ४०० एजंट्सची ‘हुकूमशाही’ आणि लक्ष्मीचा ‘प्रसाद’‘

डेली पोस्टमार्टम’ला मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ४०० हून अधिक सक्रिय एजंट्स आहेत. हे एजंट केवळ सट्टा घेत नाहीत, तर वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करत आहेत. काही बुकी तर इतके माजले आहेत की, घरगुती कारणांचे निमित्त काढून नागपूरच्या दक्षिण भागात बसून चंद्रपूरची ‘फाईल’ हाताळत आहेत.

​जिल्ह्यातील नामांकित बुकींकडे सध्या ‘लक्ष्मीचा प्रसाद’ देण्याघेण्याचे सत्र जोरात सुरू आहे. थैले भरून पैसा इकडून तिकडे हलवला जात आहे. गोवा, दिल्ली आणि इंदूर सारख्या मोठ्या शहरांतून या नेटवर्कला रसद पुरवली जात आहे. चंद्रपुरात बसून हे बुकी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ‘नेटवर्क’ चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

​👮 पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासमोर मोठे आव्हान!

​पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक धडक कारवाया केल्या आहेत. अनेक ‘मोठे मासे’ त्यांनी गजाआड केले. मात्र, ही सट्टेबाजीची साखळी एखाद्या हायड्रासारखी आहे – एक डोके कापले की दुसरे वर येते. पावसाळा आला की बेडूक जसे डराव-डराव करत बाहेर पडतात, तसेच हे बुकी पोलीस कारवाई थंडावली की पुन्हा सक्रिय होतात.

पोलिसांच्या हाती हे बुकी लागतात, पण कायद्यातील त्रुटी आणि साक्षीदारांच्या अभावामुळे ते लवकर बाहेर येतात. आता गरज आहे ती या ४०० एजंट्सची यादी तयार करून त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याची. जोपर्यंत या बुकींच्या ‘वरदहस्ता’वर घाला घातला जात नाही, तोपर्यंत हा सट्टेबाजीचा कॅन्सर चंद्रपूरला पोखरतच राहील.
​

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!