Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsगडचांदुर पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक तस्करांवर धड़क कारवाई

गडचांदुर पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक तस्करांवर धड़क कारवाई

  • चंद्रपुर, २२ डिसेंबर, सुनील तायडे, संपादक
  • गडचांदुर पोलीसांची अवैध गोवंश वाहतुक तस्करांवर कारवाई

दिनांक २२/१२/२०२२ रोजी रात्रौ अवैधपणे गोवंश जनावरांची वाहतुक करणारी दोन वाहने गडचांदुर कडे येत असल्याची गोपनीय माहीती गडचांदुर पोलीसांना प्राप्त झाली त्यानुसार गडचांदुर पोलीसांनी बैलमपुर रोडवर नाकाबंदी करून एक आयशर टेम्पो क एम. एच. २७ बी. एक्स. ५८३८ या मध्ये ०७ गोवंश बैल व बोलेरो पिकअप क एम. एच. ३४ बी. जी. ९७२६ मध्ये ४ गोवंश बैल पकडुन एकुण १६,१०,०००/- रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला व गुन्हा नोंद करून ३ आरोपी १) प्रकाश रामकृष्ण हिवरे, वय ४८ वर्ष, रा. चारगाव बुद्रुक ता. वरोरा, जि. चंद्रपूर २) रमेश महादेव गजभिये, वय ५४ वर्ष, रा.चारगाव बुद्रुक ता. वरोरा जि. चंद्रपूर ३) इरफान गुफरान खान, वय ३२ वर्षे, रा. वार्ड क्र ०४,गडचांदुर ता. कोरपना जि. चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी ताब्यात घेतलेली जनावरे तेलंगाना राज्यात घेवुन जात होते. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो. रविद्रसिंह परदेशी, मा.अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहा पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोत., पो. हवा. प्रशांत येंडे, पो.शि. महेश चव्हाण, मुंडकर, पो.शि. व्यंकटेश भटलाडे यांनी केली. . , पो.शि. खंडुजी

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!