म्हस्के चा करंट…. विकासाची परिभाषा… अभी लिच्चड चा ACB सेट….
चंद्रपूर – (22एप्रिल 2025)
(SUSHANT GHATE)
राज्य उत्पादन शुल्क विभागातील लाचखोरीची समस्या गंभीर याच्यात असून याची व्याप्ती कनिष्ठ ते वरिष्ठ पर्यंत वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरीचे सुळसुळाट या विभागातील अधिकाऱ्यांना लाभदायी प्रोत्साहन देत असल्याचे विदारक चित्र चंद्रपूर जिल्हायात पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीर दारूचे परवाने,अनियमितता, भ्रष्टाचार च्या संदर्भात राज्य शासनाची SIT गठीत झाल्यावरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भ्रष्टाचार काही थांबेना झाला आहे. काहीही काडीमात्र फरक न पडणाऱ्या या लाचखोरांना भ्रष्टाचाराचे मूळव्याध झाले आहे?
आर्थिक विकासाचे लाचखोर पायेमुळे असणाऱ्या वरोरा – भद्रावती -दुर्गापूर -माढेळी-शेगाव च्या बेल्ट मधला रिंगण थोरला, व्हाईट कार च्या म्हस्के युनिट मार्फत दरमहा लाखो रुपयाचा पाहुणचार दर महिन्या काठी जमा करत आहे.
विकासाची परिभाषा असलेला हा भामटा अधिकारी स्वतःही काही ठिकाणी सलामी देत मोठ्या भ्रष्टाचाराला लोटांगण घालतो.
🌻तीन वर्षाच्या धाकडं फालदांजित सेन्चुरी ठोकणाऱ्या या अधिकाऱ्याने चंद्रपूर जिल्ह्यातून करोडोची चल अचल संपत्ती जमवत मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरी, भ्रष्टाचार करत समृद्धी महामार्ग बनवला आहे.
🌻अगदी 500 रुपया पासून ते 60000 पर्यंत हफ्ते खोरी बांधलेल्या परवानधारक मद्य विक्रते तसेच अवैधरीत्या दारू विक्रेत्या कडून आपल्या क्षेत्रातून 15 लाख रुपयाचा अनुशेष जग्गू आपल्या कार मार्फत खेडोपाड्या पासून ते शहराच्या विकासा पर्यंत लाचखोरीचा डल्ला त्या थोरल्या च्या नड्ड्या पर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर दरमहिन्याला 10 तारखे पर्यंत फतेह करतो
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा
लाचखोर अधीक्षक संजय पाटील च्या तालमीतला हा विकास जणू भ्रस्टाचाराचा अंबर दिवाच चंद्रपूर जिल्ह्यात लावून बसला आहे.
🌟शब्दातील कृती पटलावार…
लाचखोरीत काय होणार… काही नाही होत…म्हणत भ्रष्टाचार वाढवा अशा नवीन अधिकाऱ्यांना ठीनग्या देणाऱ्या या विकासपुरुष अधिकाऱ्याला जरा महाराष्ट्र राज्यातील कायद्याचे विसर पडले आहे. जनाची न मनाची लाज विसरलेल्या या अधिकाऱ्याला पैशाचा जरा जास्तच मोह झाला आहे. अशा धुमाकेतू माजवनाऱ्या अधिकाऱ्याला कायद्याच्या चौकटीत घेऊन ठेसण्याची गरज निर्माण झाली आहे?
⭐एक्ससाईज मधला लिच्छड एक दुय्यम अधिकारी म्हणतो ACB सेट?
ज्या राज्यउत्पादन शुल्क विभागाचा पोस्टमार्टम करत भ्रष्टाचाराचा पोकळा बाहेर काढला अशा चंद्रपूर ACB ला सेट केल्याची बतावणी करत फिरणाऱ्या या “अभी लिचडू ” ला लवकरच अंगाशी येणार आहे.
ACB च्या धडाकेबाज महीला अधिकारी आणि भ्रष्टाचाराला कुठेही खतपाणी न घालणाऱ्या या महीला अधिकाऱ्याने आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ट्रॅप केले असताना चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना ही क्लीन बोल्ड केले आहे.ACB संदर्भात बेताल वक्त्यव करणाऱ्या या लिचडू ला लवकरच अद्दल घडणार आहे?
🌟”अभी लिच्चड म्हणतो ACB सेट….
मी ACB ऑफिस ला गेलो, मी बोललो, मी सांगितलं… आमचं चालतेच.. तुमचं काय आहे तर सांगा… पमाडेंग ठोकणाऱ्या या लिचडू अधिकाऱ्याने कोणत्या व्यक्तीशी चर्चा केली ही त्यालाच ठाऊक मात्र स्वतःची बडाईकी मारणाऱ्या याच्या बोंबा कानाचे सध्या पढदे फाडू लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

