Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsबडतर्फ पोलीस कर्मचारी खुनी... व्यापारी महिलेची हत्या...

बडतर्फ पोलीस कर्मचारी खुनी… व्यापारी महिलेची हत्या…

चंद्रपूर /नागपूर -(11 डिसेंबर )

 येथील बेपत्ता व्यापारी महिलेचा मृतदेह नागपूर शहरातील बेलतरोडी परिसरातील एका निर्जनस्थळी आढलला. व्यापारी महिलेचा खुनी दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसातून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेश डाहुले या पोलीस कर्मचाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.
चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्स च्या संचालिका अरुणा अभय काकडे या 26 नोव्हेंबर ला नागपूर येथील इतवारी मार्केट मध्ये दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र रात्रउशीरा पर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र त्यांचा काही थांगपत्ता न लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी चिमूर पोलिसात मिसिंगची तक्रार नोंदवली. या तक्रारीत नागपूर येथील इतवारी मार्केट मध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान 6 डिसेंबर ला दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी नरेश डाहुले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी नरेशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याच दरम्यान , आरोपीच्या कॉल रेकॉर्ड ची तपासणी करीत असताना सदर बेपत्ता महिलेसॊबत बोलणे झाल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिसांना याचा अधिक तपास केला असता आरोपी नरेश डाहुले यांनी खून केल्याची कबुली दिली. अरुणा हीं वर्गमैत्रीण असल्याचे आरोपीने सांगितले त्यामुळं त्यांची चांगली ओळख होती. दिवसभर ते सोबत होते त्यानंतर नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर आरोपीने आपल्या चारचाकी वाहणातून अरुनाचा मृतदेह बेलतरोडी येथील निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाकीत टाकून दिल्याचे आरोपी डाहुले नी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी लगेच आरोपीने सांगितलेले घटना स्थळ गाठून मृतदेहाचा शोध घेतला त्यानंतर कुटुंबियांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. आरोपी नरेश डाहुले याला खुनाच्या प्रकरणात अटक केली असून पुढील तपास चंद्रपूर शहर च्या ठाणेदार प्रभावती एकुरके करीत आहे.

📸बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांचा क्राईम रेकॉर्ड…🔍
घरफोडी, दुचाकी चोरीप्रकरणी सराईत असलेला आरोपी नरेश डाहुले यावर चंद्रपूर पोलिसांनी अनेक गुन्हे नोंदविले आहे आणि अटक हीं केली आहे. नरेश डाहुले हा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत हीं कार्यरत होता. यामुळे चंद्रपूर पोलीस विभागाची बदनामी सुद्धा झाली. अटक झाल्याने त्याला पोलीस विभागातून बडतर्फ सुद्धा केले. शेयर मार्केटमध्ये गुंतवणुकी दरम्यान तसेच आयपील सट्टा बाजारात लाखोचे कर्ज अंगावर झाल्याने डाहुले याने घरफोडी चे गुन्हे करण्यास सुरवात केली. वर्षभरानंतर त्याला हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!