Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsलुटू नका हो? आम्ही सर्व सामान्य जनता आहे!थांबा थांबा... रस्ता...रस्त्याला ट्राफिक पोलीस...

लुटू नका हो? आम्ही सर्व सामान्य जनता आहे!थांबा थांबा… रस्ता…रस्त्याला ट्राफिक पोलीस…

चंद्रपूर 20 ऑक्टोबर (सुशांत घाटे )
थांबा…. थांबा…. मी…आर. टी. ओ…..मी..हायवे ट्रॅफिक… थांबा हो… मी जिल्हा ट्रॅफिक….. अरे थांबा हो पोलीस ट्रॅफिक… यांचीच लाईन प्रत्येक महामार्ग  रस्त्यासोबत आपली गाडीचा थांबा देत चालान देण्याच्या नावाखाली वसुली चा प्रत्येय देण्याच्या नावाखाली सनासुधीच्या कार्यकाळात म्हणजे दिवाळी च्या कार्य किर्दीत जणू शासनाच्या तिजोरीत जणू काही करोडो चा भुर्दंड भरून काढणाच्या नावाखाली ऐन दिवाळीत वसुलीचा नवीन फंडा सुरु झाला आहे.

महामार्ग तर सोडा यांना लहान महामार्ग सुद्धा यांच्या रडारवर आला आहे. शेतकरी वर्ग मोठ्या आशेने आपल्या कुटुंब सोबत खरेदी साठी जात असताना हे महाशय रस्त्यात यमदूत बनून त्याची चालान बनवत!त्याची चालान वर भर नाही तर स्वतःची दिवाळी करीत वसुली करीत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. कष्टकरी शेतकरी आणि सामान्य नागरिक दिवस रात्र घाम घालून काम करीत असताना,उणीवा काडीत चालान च्या नावाखाली स्वतःची पोळी शेखत आहे?

💥ग्रामीण सोबत हायवे ट्राफिक मोठया प्रमाणात खेड्या च्या भागात त्या सोबत ट्रॅफिक एरवी जिथे फिरत नव्हती तेथे जाऊन तोंड मारत आहे? स्थानिक नागरिकांना हा प्रश्न आता सतवू लागला आहे गेल्या वीस वर्षात कधीही हा प्रश्न उत्पन्न नाही झाला पण कुठे तरी वसुलीच्या नावाखाली ही लिपापोती सुरु झाली असल्याचे आता निदर्शनास येऊ लागले आहे. लोहारा ते मुल रोड पर्यंत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, तेथून समोर जिल्हा ट्राफिक कर्मचारी आणि तेथून पुढे हायवे ट्रॅफिक आणि तेथून पुढे नागभीड च्या बॉर्डर वर पोलीस ट्राफिक असाच सुतोवाच जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर दिसत आहे. त्या सोबत भोयगाव गडचांदूर रोड वर सुद्धा यांचा असाच पराक्रम सुरु आहे. ज्या ठिकाणचे प्रामाणिक काम आहे ते सोडून फक्त वसुली चा निर्धार या व्यवसाय पद्धतीने राबविण्यात येत असल्याच दिसत आहे? आड मार्गातून सामान्य जनतेला नवीन शासकीय नियमाचं पालन करा नाहीतर भुर्दंड भरा?नाही तर आमचे खिसे गरम करा?असा उपन्यास लिहला जातं आहे? सीट बेल्ट लावला का? गाडीला काळी फिल्म आहे का? इन्शुरन्स आहे का? कीती सिटीर वाहन आहे?सर्व योग्य असल्या नंतर ही!चालन च्या नावाखाली…………….

हे सर्व प्रश्न विचारात पण ज्या वाहनाने हे ट्रॅव्हलिंग करतात हे  पालन करतात का?स्वतःच हे पालन करतात का? हा मोठा प्रश्न निर्माण आहे.

आधी स्वतःचे सर्व नियम पालन करा?ड्रायविंग लायसन्स ते इन्शुरन्स पर्यंत पण सामान्य जनतेला ठेसा नका देऊ कायद्याच्या चौकीट ठेवून वसुली फार्मुला ठरवून लुटू नका…..हे सामान्य जनतेची पोलीस अधीक्षक, उप प्रादेशि अधिकारी यांना विनंती आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!