Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsडॅशिंग, जिद्दी, चिकाटी, पारदर्शक आणि क्विक ऍक्शन!IPS रश्मि शुक्ला...

डॅशिंग, जिद्दी, चिकाटी, पारदर्शक आणि क्विक ऍक्शन!IPS रश्मि शुक्ला…

चंद्रपूर 5 जुलै( सुशांत घाटे) –

💥IPS 88 RASHMI SHUKLA

👉”ते “नाव घेताच पोलीस विभागातील प्रशासनानाला गतिमान चक्रे लागतात, देशात आणि महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी उत्तमरीत्या कामगिरी पटकवणाऱ्या, 1988 बॅच च्या IPS महिला अधिकारी रश्मि शुक्ला यांचे!

👉मुंबई येथे 15 ऑगस्ट 1965ला जन्मलेल्या, रश्मि शुक्ला यांचे सुरवातीचे शिक्षण हे मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूल येथे झाले. त्यानंतर प्रसिद्ध एलीफिस्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. कॉलेजसह 1988 मध्ये त्यांनी नागरी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC)ची परीक्षा उत्तीर्ण करीत,IPS चे स्थान त्यांनी पटकावले त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र कॅडर मध्ये देण्यात आली.त्यांनी महाराष्ट्रात संभाजी नगर ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा, आणि पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस अधीक्षक या पदावर काम केले आहे. त्यांनी या सोबतच यशस्वी कामगिरी पार पाडत असताना,त्यांना राज्य सरकारने पुणे आणि नागपूर च्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या कार्यकारी अधिकारी पदावरह नियुक्त केले होते. असता त्यांनी  या ठिकाणी सुद्धा विशेष कामगिरी केली आहे.

👉यानंतर केंद्र सरकारच्या आदेशनुसार त्यांची केंद्रीय अन्व्हेंषण ब्युरो (CBI)चे दिल्ली आणि हैद्राबाद या ठिकाणी उपमहनिरीक्षक (DIG)वरही नियुक्ती करण्यात आली होती. CRPF च्या हैद्राबाद क्षेत्रात ही त्यांनी ADG म्हणून जवाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर मुंबई येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त नंतर त्यांची गतिमान महिला अधिकारी म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्यात कामगिरी बघता त्यांना पहिल्या महिला अधिकारी म्हणून पोलीस महासंचालक या पदाची धुरा महाराष्ट्र राज्याची देण्यात आली आहे.

👉1988 च्या बॅच च्या IPS महिला अधिकारी रश्मि शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावर वर्णी लागताच त्यांनी मुंबई सहित महाराष्ट्र पोलिसांची खाकी बदनाम होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेत उपाययोजना राबवत सुष्म आणि तंतोतंत नियोजन साठी करडी नजर,महाराष्ट्र पोलीस खात्यावर ठेवली आहे. राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर घेत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था योग्य रीत्या राबवण्या साठी नेहमीच व्हिडीओ कॉन्फेरंस द्वारे आपले कडक संदेश दिले आहे. राज्यातील पोलीस विभागाला उत्तम कार्याची ओळख निर्माण करण्याकरिता त्या स्वतः जातीने लक्ष देत मुंबई ते गडचिरोली चा हीप्रवास करीत नक्सल चळवळी ला हादरा देण्याकरिता त्या गतिमान महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात नक्सल ऍक्टिव्हिटी चा बिमोड करण्या करीता त्यांनी विशेष ऑपरेशन राबवण्याचे पोलिसांना आदेश दिले आहे. त्यांची प्रगतीशील  योजने ने अनेक नक्सलानी समोर येत पोलिसांसमोर आत्मसंमर्पण केले आहे.

👉महाराष्ट्र राज्यात त्यांना पहिल्या महिला अधिकाऱ्यांचे पोलीस महासंचालक पदी मिळाले स्थान म्हणजे त्यांच्या प्रगतीपथाचे गतिमान शासन म्हणून ओळखल्या जात आहे. झटपट निर्णय घेण्याची क्षमता ठेवणाऱ्या IPS रश्मि शुक्ला या कुठल्याही तक्रारी ची  लगेच दखल घेत पोलिसी यंत्रनेला कामाला लावतात.  भ्रष्टअसणाऱ्या प्रणाली यंत्रनेला पारदर्शक चेहरा मोहरा बनवन्यकारिता प्रामाणिक हेतूने त्या सोपस्कार पार पाडीत आहे.

💥राज्यातील त्या एक डॅशिंग महिल्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्र प्रणालीत कार्यान्वित आहे. सध्या लाचलूचपत विभागाचा ही अतिरिक्त कार्यभार रश्मि शुक्ला यांच्याकडे च असल्याने त्यांची भ्रष्टाचार प्रणाली शी संबंधित विभागावरही करडी नजर आहे. एकूणच पूर्णतः वस्तुस्थिती वर पारदर्शक कार्य प्रणाली ने स्थान निर्माण करणाऱ्या IPS रश्मि शुक्ला यांचा सिंहाचा वाटा या पोलीस विभागाला मिळाला आहे. पोलीस महासंचालक या पदाचा बहुमान मिळवणाऱ्या त्या जिद्दी, चिकाटी, पारदर्शक अँड क्विक ऍक्शन साठी रश्मि शुक्ला या 88 बॅच नी नावाजलेल्या आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!