Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूर पोलीस विभागातील भरोसा सेल वर अपेक्षा आहे न ‼️

चंद्रपूर पोलीस विभागातील भरोसा सेल वर अपेक्षा आहे न ‼️

चंद्रपूर 1जुलै 2024-
पती- पत्नी च्या वाद विवादातील अनेक घटना,पोलीस स्टेशन ला गुन्ह्याच्या स्वरूपात येऊन धडकतात! त्यात महिला वरती होणारे अत्याचार, असो की हुंडाबळी ची घटना त्याचे विशेष उपाययोजने करण्याचे प्रकरणे निपटाऱ्या करण्याकरिता, महाराष्ट्र पोलिसांचा “भरोसा सेल” प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे.
👉चंद्रपूर जिल्ह्यातील भरोसा सेल च्या पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम ह्या भरोसा सेल ला अत्यंत संयमी पद्धतीने, लक्ष देऊन प्रकरणे योग्य प्रकारे निपटारे करण्यात यशस्वी झाल्या आहे.
पती पत्नी चे आपसी तडजोडी करीत त्यांनी त्यांची तुटलेली संसारे परत एकदा बसवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
👉
समाजात कौटुंबिक वादातुन अनेक प्रकरने पाहता,गुन्ह्याचे स्वरूपात भांडणे होत असतात, काही भांडणाचे पडसाद पूर्ण कुटुंबावरही येऊन ठेपतात,असो नसो मात्र मग वचपा काढण्याच्या भावनेतून खोट्या तक्रारी च्या अनेक किस्से समोर येतात!

पोलीस स्टेशन ला प्रकरणे पोहचली की समजूत घालवली जाते, पण तंटा काही सुटणारा दिसत नसताना पोलिसांनाही मग तक्रारी च्या अनुषंशांगाने गुन्हे दाखल करवायास भाग व्हावे लागते!
अनेक संसारा मध्ये कौटुंबिक वादातुन झालेल्या, प्रकरणात लहान मुलांचे आयुष्य ही भरकटून जातात, समस्या काय सुटेनासे मार्गांवर असते त्यामुळे मग न्यायालयाच्या पायऱ्या पती पत्नी झिझवत या प्रकरणाच्या निकाला करीता अपेक्षा करीत अनेक वर्ष घालवतात .
अपेक्षा आहे न ‼️
पण न्यायालयच्या भानगडी करण्यापेक्षा भरोसा सेल वर त्या पती पत्नी ला समजूत घालीत लाख मोलाचे मार्गदर्शन करीत भरोसा सेल वर अपेक्षा आहे न!
चालू वर्षात भरोसा सेल नीं पती पत्नी वादातील 103 प्रकरणे निपटारा करीत परत एकदा त्यांची संसारे थाटल्याने त्या संसाराला, गुण्या गोविंदाणे आनंदित झाल्याचे पाहावंयास मिळत आहे.
काही प्रकरणात तडजोड न झाल्याने पोलीस स्टेशन ला ही पाठवण्यात आले आहे.आलेल्या तक्रारी चे शांत, संयमी विचार करून त्या वर कसा मार्ग निघेल यावर आपली मानसीकेतून यशस्वी उपचार करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम नेहमीच तत्परतेने कामकाज करीत असतात.
भरोसा सेल वर अनेक तक्रारी च्या केसेस बघता कधी कधी त्यांना ही दमछाक होते मात्र त्या आणि त्यांच्या टीम ने भरोसा सेल ला अपेक्षित यश आतापर्यंत दिलेले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सुचने नुसार महिला च्या सबळी करण करण्याण्याकरिता तसेच अत्याचार शी संबंधित प्रकरणच्या अहवाल ची लगेच दखल घेतली जात असून चंद्रपूर भरोसा सेल वर “अपेक्षा” आहे न!याचाच उदगार होत असतो! त्यामुळं प्रामाणिक कामाची पावती या महिला अधिकारी ला एक दिवस त्यांच्या कार्याची भेटेल अशी अपेक्षा करण्यात येते!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!