चंद्रपूर 20 जून – सुशांत घाटे
👉गर्दीचा फायदा घेत चंद्रपूर – नागपूर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या चालणाऱ्या एस. टी. बसेस मध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे.
💥 तीन – चार महिलांचा या चोरीच्या घटना मध्ये समावेश असल्याचे एका प्रवासी महिलेला नुकताच तीन दिवसापूर्वी चंद्रपूर – नागपूर प्रवासा दरम्यान आला.
👇
चंद्रपूर वरून सकाळच्या एस टी बसने ही महिला प्रवासी निघाली असता बुटीबोरी वरून तीन महिला प्रवासी चढल्या या दरम्यान सतत लक्ष ठेवून आपल्या बॅग वर ती पीडित महिला बसली होती. दरम्यान त्या महिलेला फोन आला असता ती फोन वर बोलतच असताना, एक महिला तिच्या समोर उतरण्याच्या बहान्याने समोर आली,पीडित महिला प्रवासी आपल्या फोन वर बोलत असताना तिचा स्टाफ आला असता ती सोमलवाडा येथे उतरली, खाली उतरल्यावर ती आपली बॅग मध्ये पर्स बघत असता तिची पर्स ही दिसेनासे झाली.
💥 क्षणात च त्या बस चा त्या महिलेने ऑटो नी पाठलाग केला असता, मात्र त्या तिन्ही ही महिला छत्रपती चौक येण्या अगोदरच बस ला मध्येच थांबवून तिथून पसार झाल्या.
🚎 त्या चोरी झालेल्या पर्स मध्ये पीडित महिलेचे 12000 रुपये चोरी गेले असता तीला तिची फोन वर क्षणात झालेली चूक लक्षात आली.
एरव्ही चंद्रपूर च्या बस स्टॅन्ड वरून ही मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना मध्ये वाढ़ झाली आहे. चंद्रपूर च्या बस स्थानकावर महिला भुरटे चोर सक्रीय असल्याने पर्स चोरी,मोबाईल चोरी जाने, सामान चोरी जाने याच्या मोठ्या घटना वाढल्या आहे.
भुरटे चोर ही या ठिकाणी डाव साधून हाथ मारू लागल्याने पोलीस विभागाने या ठिकाणी गस्त वाढवने महत्वाचे आहे. चंद्रपूर च्या बस स्थानकावर अद्याप CCTV नसल्याने चोरीच्या घटना मध्ये दिवसागनिक वाढ होत आहे.
चोरी ची घटना झाली की गावाला जाण्याची घाई आणि तक्रार करण्यास लागणारा दीर्घ वेळ या करीता पोलिसात तक्रारी देण्याचा काही लोकांचा मानस नसतो. त्याच संधी चा फायदा घेत सध्या चोरांना सुगीचे दिवस आले आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

