Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsइंदिरा गांधी गार्डन स्कूलचे 2 विद्यार्थी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत विजयी

इंदिरा गांधी गार्डन स्कूलचे 2 विद्यार्थी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत विजयी

इंदिरा गांधी गार्डन स्कूलचे 2 विद्यार्थी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत विजयी

चंद्रपूर : एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 2 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेत बाजी मारली आहे. 14 वर्षांखालील वयोगटातील विजेते काव्य कुंटेवार (इयत्ता 6 वी) आणि सौम्यता शृंगारपवार (इयत्ता 9 वी) यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर महानगरपालिका व संपूर्ण जिल्ह्यातील शाळांसाठी थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेत शहरातील अंदाजे 20 शाळेतील शाळांमधील जवळपास 150 विद्यार्थ्यांसहित सपूनर जिल्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दोन्ही विजेत्यांनी स्पर्धेत प्रत्येकी 5 फेऱ्या खेळल्या व प्रत्येक फेरियांती आपल्या विरोधी खेळाडूंना पराजित करून आपापल्या गटात प्रथम स्थान पटकाविला. शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल चव्हाण व रेशमा पठाण यांनी स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेत मुख्याध्यापक बावानी जयकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेच्या संचालन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!