Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsकाका, ती माझी गाडी नाहीये... मी काहीच केलं नाही... मला का मारत...

काका, ती माझी गाडी नाहीये… मी काहीच केलं नाही… मला का मारत आहात?” निर्लज्ज दरबार!

पैशांचा माज अन गरिबावर वार,
लाज कशी वाटली नाही रे दरबार!
मुलाच्या अश्रूंचा हिशोब चुकता होणार,
तुझी ही हिटलरशाही आता जनताच मोडणार!

चंद्रपूर:
“बुद्धिमत्ता कशी घास खायला जाते” आणि पैशांची नशा डोक्यात चढली की माणूस कसा जनावरापेक्षाही हिंस्त्र होतो, याचं एक जिवंत आणि संतापजनक उदाहरण आज चंद्रपूर शहरात भरदिवसा पाहायला मिळालं. स्वतःला चंद्रपुरातील मोठे प्रतिष्ठित व्यावसायिक समजणारे आणि ‘आदर्श’ नावाने पेट्रोल पंप चालवणारे शैलेश दरबार (अग्रवाल) यांची क्रूर आणि निर्लज्ज हिटलरशाही आज मुल रोडवरील त्यांच्याच पेट्रोल पंपावर उघडी पडली आहे. एका निष्पाप, १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर आपला बळाचा आणि पैशांचा माज दाखवत या गर्विष्ठ मालकाने जी अमानुषता दाखवली, त्याने संपूर्ण चंद्रपुरात संतापाची लाट उसळली आहे.

💢भरदुपारी १२:४५ ची ती थरारक घटना!

​आज दुपारी १२:४५ वाजताच्या सुमारास, इंडस्ट्रियल वार्डात राहणारा एक १५ वर्षांचा निष्पाप मुलगा आपल्या काकांसोबत मुल रोडवरील ‘आदर्श’ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. पंपावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने, वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून तो मुलगा तेथून निघून कडेला उभी असलेल्या दुचाकी वर,पंपाच्या एका कोपऱ्यात,… तो फक्त त्याच्या काकांची वाट पाहत तिथे थांबला होता.

​तेवढ्यात, ‘आदर्श’ पेट्रोल पंपाचे मालक शैलेश दरबार हे त्यांच्या अलिशान चारचाकी वाहनाने पंपाच्या आवारात आले. गाडीतून उतरतानाच त्यांच्या डोक्यात पैशांची आणि प्रतिष्ठेची मस्ती ठासून भरलेली होती. कोपऱ्यात उभी असलेली ती दुचाकी पाहताच, या तथाकथित मोठ्या व्यवसायिकाचा पारा थेट सातव्या गगनाला भिडला. विवेक शून्य झालेल्या या मालकाने त्या लहान मुलाची बाजू ऐकण्याची साधी तसदीही घेतली नाही.

​गाडीतून उतरताच शैलेश दरबार यांनी थेट त्या अल्पवयीन मुलावर हल्ला चढवला. कसलाही विचार न करता, एका गुंडाप्रमाणे त्या मुलाची कॉलर पकडली  शेकडो लोकांच्या समोर त्याच्या गालावर दन दन झापड्या मारायला सुरुवात केली. हा हल्ला इतका अचानक आणि अमानुष होता की तो लहान मुलगा प्रचंड घाबरला.

​तो निष्पाप मुलगा डोळ्यातून अश्रू ढाळत, हात जोडून त्या बेरहम मालकाला विनवणी करत होता—”काका, ती माझी गाडी नाहीये… मी काहीच केलं नाही… मला का मारत आहात?” पण या निर्लज्ज आणि संवेदनाहीन झालेल्या मोठ्या व्यवसायिकाला त्या लहान मुलाच्या आक्रोशाची, त्याच्या अश्रूंची साधी दयाही आली नाही. मारहाण करूनही या दबंग मालकाचं मन भरलं नाही, त्यांनी भर बाजारात त्या मुलाला अत्यंत अर्वाच्च आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. एका गरीब घरच्या मुलावर आपली ताकद दाखवताना या मालकाची तथाकथित ‘उच्चभ्रू’ संस्कृती पुरती धुळीस मिळाली होती.

💢 ‘उच्चभ्रू’ की मानसिक विकृत? नागरिकांमध्ये तीव्र संताप!

स्वतःला समाजाचे राजे समजणारे हे लोक वास्तवात मानसिकदृष्ट्या किती दरिद्री आणि अशिक्षित आहेत, हेच या घटनेने सिद्ध केलं आहे. चूक नसताना केवळ गरिबीचा आणि लहान असण्याचा फायदा घेऊन अशी अमानुष मारहाण करणे म्हणजे निव्वळ गुंडगिरी आहे. भरदिवसा एका अल्पवयीन मुलावर झालेल्या या अन्यायकारक हल्ल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांचा थरकाप उडाला आणि नंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला.

पैशांच्या जोरावर कायद्याला आणि गरिबांना खिशात ठेवणारी ही ‘हिटलरशाही’ चंद्रपूरकर खपवून घेणार का? या अशा मस्तवाल व्यवसायिकांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाईचा बडगा उगारणार की पैशांच्या दबावाखाली हे प्रकरण दाबले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, या निष्पाप मुलाच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब या ‘आदर्श’ मालकाची अब्रू वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!