Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची ऐतिहासिक नियुक्ती! 🌟 ✨ वसुमना पंत यांची दमदार...

चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची ऐतिहासिक नियुक्ती! 🌟 ✨ वसुमना पंत यांची दमदार एंट्री; प्रशासनात नवा अध्याय सुरू!

🌟 चंद्रपूरला पहिल्या महिला जिल्हाधिकाऱ्यांची ऐतिहासिक नियुक्ती! 🌟
✨ वसुमना पंत यांची दमदार एंट्री; प्रशासनात नवा अध्याय सुरू!

चंद्रपूर :
जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात सुवर्णक्षण ठरणारी घटना घडली आहे. चंद्रपूरला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी मिळाल्या असून वसुमना पंत या उद्या (शुक्रवारी) आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
२०१७ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी असलेल्या पंत यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या पदांवर प्रभावी कामगिरी बजावली आहे. यापूर्वी त्यांनी वाशिम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना विकासकामांना गती दिली होती. त्यानंतर नागपूर येथे सहायक आयुक्त पदावर कार्यरत असतानाच त्यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची संभाजीनगर येथे बदली झाली असून त्यांनी तब्बल साडेतीन वर्षे चंद्रपूरमध्ये काम पाहिले. विशेष म्हणजे, तेही उद्याच संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

 🌻महिला नेतृत्वामुळे अपेक्षा उंचावल्या!

🍁वसुमना पंत यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनात संवेदनशीलता, पारदर्शकता आणि वेगवान निर्णयक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!