Wednesday, November 25, 2026
HomeBreaking News"नंदू सबका बंधू" काँग्रेस च्या बंडखोरांची प्रचारात मुसंडी! शहराच्या राजकारणाची चाबी आता...

“नंदू सबका बंधू” काँग्रेस च्या बंडखोरांची प्रचारात मुसंडी! शहराच्या राजकारणाची चाबी आता वड्डेटीवार कडे?

काँग्रेसमध्ये ‘अंतर्गत स्फोट’! तिकीट कापल्याने निष्ठावंतांचे बंड; वडेट्टीवार समर्थक ‘मैदानात’ 

​चंद्रपूर: (सुशांत घाटे)
चंद्रपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील ‘राजकीय वैमनस्या’चा फटका पक्षाच्या निष्ठावंतांना बसल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पक्षाशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहिलेले माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर आणि माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांचे तिकीट कापल्या गेल्याने त्यांनी आता थेट ‘अपक्ष’ म्हणून शड्डू ठोकला आहे. यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू झाला आहे

🍁”नंदू सबका बंधू” चा खासदार गटाला ठेंगा!
​विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नंदू नागरकर हे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र, राजकीय गणितात त्यांचे तिकीट कापले गेल्याने वडेट्टीवार समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्याला डावलून कोणतं राजकारण साधलं जातंय?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान, नागरकर यांनी ‘नंदू सबका बंधू’ म्हणत प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

🍁सुनीता लोढियांची ‘उत्तुंग भरारी’
​दुसरीकडे, पक्षाशी इमाने-इतबारे काम करणाऱ्या सुनीता लोढिया यांनीही अन्यायाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे. तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून प्रचारात मोठी झेप घेतली असून, मतदारांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

🍁वडेट्टीवारांची ‘गुणवत्ता’ पणाला; चावी आता ‘एका’ हाती!
​जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये निर्भेळ यश मिळवून देणाऱ्या विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. एकीकडे पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि दुसरीकडे स्वतःचे कट्टर समर्थक, अशा कात्रीत वडेट्टीवार सापडले असले तरी, शहराच्या राजकारणाची ‘चाबी’ आता त्यांनी स्वतःच्या हाती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!