तथाकथित पत्रकारचा झाला पोपट! महीला अधिकाऱ्याने तोडले त्याच्या अकलेचे तारे…
चंद्रपूर -(21 ऑक्टोबर 2025)
🌟जिल्ह्यातील काही भोंदू बाबा पत्रकारांनी दिवाळीच्या सणासुदीत चांगलाच कहर माजवाला आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जाहिराती च्या नावाखाली अक्षरशः मोठी पायपीट ही केली. मात्र जो हाडाचा आणि समाजाचा कणखर खडा असा, आरसा असणाऱ्या सामान्य पत्रकारांना आता मोठा संघर्ष करावा लागत आहे.
👉चंद्रपूरातील एका तथाकथित पत्रकाराने ACB च्या एका महीला अधिकाऱ्याला फोन करत काही विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली, आणि आपण किती परिपक्व पत्रकार आहो याचा परिचय देत त्याने आपल्या अनुभवाचा पिटारा त्या महीला अधिकाऱ्या जवळ खोलला?
त्याने या महीला अधिकाऱ्याला गोपनीयता वरती काही प्रश्न केले, पण राज्याची एकमेव गोपनीय एजन्सी असणाऱ्या ACB कुठलीही गोपनीयता माहिती बाहेर देऊ शकत नाही हे या तथा कथित पत्रकाराला ठाऊकच नाही!
पण त्या महीला अधिकाऱ्याने, या तथाकथित पत्रकाराची इतकी फजिती केली की, त्याचे अकलेचे पत्रकारितेचे तारे अक्षरशः दिवसा चाबी देत उघडले.
👉तथाकथित पत्रकाराला SP आणि चंद्रपूर SP चा फरक च कळेना!
ज्या पत्रकाराला ACB चें पोलीस अधीक्षक च कौन आहे? कुठे बसतात हेच ठाऊक नाही, रेंज काय असते हीच कल्पना नाही? तो खरंच पत्रकार आहे का? असा प्रश्नच त्या पत्रकारावर दाघत त्या तथाकथित पत्रकाराची या महीला अधिकाऱ्याने चांगलीच कानउघडानी केली?
तो तथाकथित पत्रकार चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सोबत एका विषया वर बोलणे झाले असल्याचे या अधिकारीला सांगत होता. पण वारंवार आमचा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याशी ACB चा कुठलाही संबंध येत नसल्याचे सांगत असताना या तथाकथित पत्रकाराला काही समजेनासे झाले!
🍁तथाकथित पत्रकाराची फजिती?
मग तो तथाकथित पत्रकार त्या महीला अधिकाऱ्यालाच विचारू लागला की, मग तुमचे SP कौन तर त्या महीला अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही इतके वेळ मला काय विचारत होते, मी सांगत असताना तुम्ही वारंवार सुदर्शन सर से बात हुयी हे मला काय सांगत होते, असे प्रश्न करत आमचे पोलीस अधीक्षक सुदर्शन सर नाही तर दिगंबर प्रधान सर आहेत आणि कुठलीही गोपनीयता आम्हाला देता येत नाही असे म्हणत तुम्ही खरंच पत्रकार आहात का? असे म्हणत पुढील वेळेस अभ्यास करून बोला हा मोलाचा सल्ला त्या तथाकथित पत्रकाराला या महीला अधिकाऱ्याने दिला.
पण असे बहुतांश तथाकथित पत्रकारांनी जिल्ह्यात पत्रकारितेचा फालुदा केला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


