Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsअन्न औषध प्रशासन विभाग 💢💢चेहऱ्या मागचे रहस्य... भ्रष्टाचार चा अड्डा.. निरीक्षक सातकर...

अन्न औषध प्रशासन विभाग 💢💢चेहऱ्या मागचे रहस्य… भ्रष्टाचार चा अड्डा.. निरीक्षक सातकर झाले पैसे घेणारे कातकर? व्यापाऱ्याला ब्लॅकमेल!

चंद्रपूर – 9 जुलै 2025(सुशांत घाटे)

💢धडक… बेधडक कारवाई चा फास आवरणाऱ्या अन्न सुरक्षा विभागाची कारवाई चा बेहाल माहोल सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गाजत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अन्न सुरक्षा विभागाची कार्यकीर्द गाजवणाऱ्या एका अधिकाऱ्याने कोट्यवधीची माया या विभागातून भ्रष्टाचार करत ठोकली असल्याचे सध्या बोलले जात आहे? कधी कारवाई चा फास टाकून तर कधी महिन्याची हफ्तेखोरी करणाऱ्या चंद्रपूर अन्न औषध प्रशासन विभागातील निरीक्षक पदावर असणाऱ्या गिरीश सातकर यांनी आपल्या भ्रष्टखोर वृत्तीतून करोडोची माया गेल्या पाच वर्षांपासून या विभागात नोंदविल्या ची माहिती विश्वसनीय सूत्रांनी डेली पोस्टमार्टम नी दिली आहे!
साधारण तीन ते चार वर्षाचा बदली चा कार्यकाळ असणाऱ्या या विभागात गेल्या सहा वर्षा पासून हा अधिकारी जिल्ह्यातील तमाम अवैध सुंगधित तंभाखू पासून तर रोड वर दूध विक्रेत्या कडून कारवाई च्या नावाखाली हफ्तेखोरी करीत असल्याचे आरोप सध्या या अधिकाऱ्यावर होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील किराणा दुकानाचे संचालक मकसूद पारेख यांच्यावर काई दिवसा अगोदर यांनी सुंगधित तंभाखू ची कारवाई थांबवण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी केली असता दुकानंदार मकसूद पारेख नी या अधिकाऱ्याला फटकारून लावले!

💢💢15 हजार चे गुपित रहस्य…
कारवाई केल्यानंतर या अधिकाऱ्याने महिन्या काठी 15 हजार रुपये द्यावे लागनार असे बोलत गेल्या सहा महिन्या चे 15 हजार प्रमाणे 90000 हजार देण्यास सांगितले? मात्र या व्यापाऱ्याने आपली अवस्था सांगत नाही देऊ शकणार म्हणून हात जोडले मात्र भ्रष्टखोर वृतीच्या या माथ्याशी जयसूख नावाचा संसर्ग या अधिकाऱ्याच्या हातात बल्लारपूर मधून सुंगधित तंभाखू च जाळ ओडून याला महिन्याकाठी लाखोची माया देत असल्याने सध्या या अधिकाऱ्याचे जिल्ह्यात अनेक तालुक्यातील भ्रष्टाचाराचे बाण फिरकत आहे.
चंद्रपूर येथील भावसार चौकातून या अधिकाऱयाच्या चार पायाच्या अंतरावर असणाऱ्या एका दुग्ध व्यवसायाकडून 25 हजार रुपयाची तोडी सुद्धा गेल्या महिन्या भर आधी या अधिकाऱ्याने केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जिल्ह्यातील कोरमंडळ ला आपल्या पद्धतीने हाथाळण्याची या अधिकाऱ्याची वृत्ती सध्या फूड डिपार्टमेंट मध्ये गाजू लागली आहे.
काही महिन्या आधी बनावट पनीर च्या दुकानात कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याने तोडीबाज कारवाई चा धूम धडाका चंद्रपूर जिल्ह्यात माजवला असल्याचे बोलल्या जात आहे.
जिल्ह्यातील हॉटेल, सुंगधित तंभाखू तस्कर आणि इतर अनेक संबंधित व्यापाऱ्याकडून हा अधिकारी दर महिन्याला लाखों रुपयाचा मलिंदा जमा करत आपल्या खिशात भरत आहे?
या बाबतच्या खात्रीशीर वृताची दखल घेत डेली पोस्ट मार्टम नी याची शहाणीशा करत त्यां अधिकाऱ्याला या संदर्भात विचारणा केली असता आपण असे करत नसल्याचे सांगितले मात्र बोलण्याच्या अवस्तेत नसलेल्या या अधिकाऱ्याला डेली पोस्टमार्टम चा घाम फुटू लागला!
गेल्या अनेक वर्षांपासून याच विभागाला हार्ट चा प्रॉब्लेम सांगत चिपकून बसलेल्या अन्न सुरक्षा विभागातील अधिकारी मात्र करोडोची माया साध्या वेशातून जमवून अपार मालकीचा दावेदार झाला असल्याचे बोलल्या जात आहे….. To Be Continue

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!