Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsलाचखोर पोलीस ठाण्याच्या एपीआय ला एसीबी चा दणका!दोन लाखाची रक्कम घेताना दबोचले......

लाचखोर पोलीस ठाण्याच्या एपीआय ला एसीबी चा दणका!दोन लाखाची रक्कम घेताना दबोचले… पोलीस वर्तुळात खळबळ…

ACB चा दणका! लाचखोर API जाळ्यात..

शेतीचे विक्रीपत्र, फसवणूकप्रकरणी सेटलमेंटसाठी मागितली रक्कम

नागपूर(6जानेवारी )-: शेतीचे विक्रीपत्र व फसवणूक प्रकरणी कोणतीही कारवाई न करता सेटलमेंट करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या एपीआयला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

प्रेमानंद दादाराव कात्रे (४३) असे आरोपीचे नाव असून तो कोराडी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कामठी तालुक्यातील कवठा येथील संयुक्त मालकीच्या शेतीचे विक्रीपत्र व फसवणूकप्रकरणी तक्रारदार (४२, रा. नागपूर) विरोधात कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला होता. या प्रकरणात कोणतीही कारवाई न करता सेटलमेंट करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराला दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ४ फेब्रुवारी रोजी तक्रार दार ने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पडताळणी केली असता आरोपीने पंचांसमक्ष दोन लाख रुपयांची स्वतः लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ५ फेब्रुवारी रोजी ती रक्कम घेत असताना पंचांसमक्ष आरोपीला रंगेहाथ पकडून रक्कम ताब्यात घेतली.

पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता ३०० रुपये सापडले. आरोपीचा मोबाइल ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी पाठविला आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली. कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक प्रीती शेंडे, निलेश उरकुडे, भागवत वानखेडे, भरत ठाकूर, हेमराज गाजरे, दीपाली भगत, विजय सोळंखे यांनी केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!