Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsराजू चा विषय लई हार्ड आहे! दोन कोटी व्याजाने वाटले? हरपाल आणि...

राजू चा विषय लई हार्ड आहे! दोन कोटी व्याजाने वाटले? हरपाल आणि साई च्या बँक खात्यातून जुगाराचे ऑनलाईन कनेक्शन!2000रुपयानी नौकराचे काम करणारा राजू जवळ सात कोटीची प्रॉपर्टी आली कुठून?

चंद्रपूर  9 सप्टेंबर 2024- ✨SUSHANT GHATE

📢अगदी एका छोट्याश्या उदयोग्यातुन करोडो रुपयाची आघाडी घेणारे कितीतरी भारतीय नागरीक आपण पाहिले असाल,मात्र ज्याचा काहीच उद्योग नसताना असा ही रत्न चंद्रपूरातील शहरात उदयास आला आहे.

👉राजेंद्र उर्फ राजू ची खरी परिस्थिती?

♐⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬

✴️प्रसिद्ध यादीत जरी नसला तरी विठ्ठल मंदीर ते विजय टॉकीज जवळील भानापेठ  वार्ड पर्यंत रोज दिवसातून 100 घिरट्या घालणारा राजेंद्र उर्फ राजू चा विस्तार इतका आहे कीं चांगल्या चांगल्या उद्योगाना धडकी बसेल?😨

👉कुठलीही वडिलोपार्जित प्रॉपर्टी नसताना आज च्या घडीला अवघ्या काही वर्षात करोडो रुपयाची छत्रछाया बनवणारा राजू नी कितीतरी लोकांना बळी चे बकरे बनवत रेकॉर्ड ब्रेक रुपये त्यांच्या कडून दारू आणि व्यसना चे आमिष देत लुटारू पद्धतीने ओढले आहे!

 

👨‍⚖️दुकानात नौकरचे काम करणारा राजू… कसा झाला कोट्यधीश?

👉पेट्रोल साठी महाग असलेला राजेंद्र उर्फ राजू हा 2006 मध्ये जलाराम नावाच्या एका दुकानात 2000 रुपयाने नौकरी करायचा त्याच्याच बाजूला असलेल्या एका एजेन्सी मधील शुभम नावाच्या तरुना सोबत त्याची ओळख निर्माण झाली.
क्रिकेट चे जुगाराचे व्यसन जडलेल्या त्या तरुणाने राजेंद्र उर्फ राजू ला क्रिकेट च्या विश्व विक्रमी चा फंडा सांगितला राजू ने तो फंडा अंमलात आणत खाई- लगाई चा छोटा व्यापार सुरु करीत धंदा सूरू केला. मग हळू हळू ओळख निर्माण होताच मोठ्या गल्ल्यावर हात कसा मारायचा याचे या धंद्यातील हायब्रीड शिक्षण घेत राजू नी दारू बंदीच्या काळात अनेक कोट्यधीक्षाना रस्त्यावर आणून सोडले?

👉जैस्वाल नावाच्या एक व्यक्ती ने जवळपास 1 कोटी नी आपले क्रिकेट जुगारावर राजू च्या घशात मांडले, तसाच रोशन ने सुद्धा आपले 50 लाखाचे डाव याच राजू कडे लावत कर्जबाजारी चे सावटाने आयुष्यावर काळे ढग दाटून आले. असे कितीतरी बँकेचे, नौकरीतील लोकांना या ठगबाज राजू नी क्रिकेट च्या जुगारातून शिकार करीत आपला कोट्यवधीचा डाव रचला आहे!

💥राजू ची व्याजमालिका ‼️

✨जो व्यक्ती क्रिकेट जुगारीतील हरलेले पैसे नाही देऊ शकला त्यासाठी त्याने व्याजमालिका सुरु केली आणि त्याचे उरले सुरले कपडे सुद्धा या भामट्याने काढले आहे.

☎️हरपाल आणि साई च्या नावाने बँक खात्यातून राजू चालवतोय व्यापार?

🏁राजेंद्र उर्फ राजू ने अल्पवधित करोडो रुपयाची जुगारच्या माध्यमातून कमाई करीत
“हरपाल ” आणि साई च्या नावाने बँकेत तील व्यवहार स्वतःच्या नावाने बनवून ठेव्हले आहे. क्रिकेट जुगारातील किंव्हा व्याजातील येणारी ऑनलाईन रक्कम हा या दोन अकाउंट मध्ये घेतो. हरपाल चे चेक, ATM बँक पास बुक, फोन पे वगैरे सर्व राजू आपल्याच जवळ ठेव्हत हरपाल ला राजू महिन्याला चार – पाच हजार रुपयाची दारू पाजून आपला व्यवहार चालवत असतो.

💥व्याजाने वाटले दोन कोटी रुपये?

✨✨✨✨
क्रिकेट जुगारातील इतका मोठा पैसा बघता राजू नी लोकांना डेली तसेच महिन्याकाठी पाच ते दहा प्रती माह टक्के ने व्याजाने पैसे देने सुरु केले. जवळपास दोन कोटी रुपये व्याजाने वाटल्याचा आकडा समोर येत आहे. कित्येक लोकांनी राजू जवळ आपले सोने गहाण ठेव्हले मात्र सोडवू न शकल्याने आता पर्यंत कितीतरी सोने सुद्धा राजू च्या घशात अडकले!

✨प्रत्येक वाढदिवसला 10 तोळ्याची सोन्याची चैन?

👇
दर वाढदिवसाला राजेंद्र उर्फ राजू 10 तोळ्याची सोन्याची चैन घेतो आनी मिरवतो? व्याजाच्या रकमेचा धनादेश घेत आपण सावकार असल्याचा त्याचा मोह आता त्याला जडला आहे. अल्पवधित 7 कोटी च्या जवळपास बनलेला राजू छोटा नागपूर, दाताला रोड, देवाडा इथे प्रॉपर्टी चा ढीग लावून बसलेला आहे. वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती नसताना वडील कुठल्याही नौकरी वर नसताना मोठ्या प्रमाणात राजू जवळ असलेली चल – अचल स्थावर मालमत्ता, रोख रक्कम, सोने नांने यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

💥💥💥💥
राजेंद्र उर्फ राजू चा लवकरच पूर्ण एकूण रकमेचा परिचय पत्र आयकर विभागासहित उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती आली आहे.राजेंद्र उर्फ राजू मुळे
क्रिकेट क्षेत्राच्या जुगारात, व्याजामुळे जर आपण त्रासला असेल तर आपण आपली तक्रार थेट पोलीस स्टेशन ला करा. जर काही आपल्यास मदत हवी असल्याच किंव्हा तक्रारीचा ध्यास असल्यास डेली पोस्ट मार्टम ला कळवा. आपली माहिती गुप्त ठेवण्यात येईल.

9637066686

सुशांत घाटे, चंद्रपूर

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!