Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsपेट्रोल -डिझेल अवैध कारभार आणि भंगार चोरांना दिलेली रानमोकळीक म्हणजे काय? पडोली...

पेट्रोल -डिझेल अवैध कारभार आणि भंगार चोरांना दिलेली रानमोकळीक म्हणजे काय? पडोली पोलीस… ‼️

चंद्रपूर 30मे –
एखाद्या पोलीस स्टेशन ला ठाणेदार पदी वर्णी लागणे म्हणजे आपल्या कामाच्या प्रती दिली गेलेली जवाबदारी ची पावती समजली जाते.

त्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांची कारकीर्द सपशेल जिल्ह्यात पोलीस खात्यात फेल ठरली! गुन्हेगारी क्षेत्राने डोके वर काढत चांगलाच जिल्ह्यात धडाका माजवला होता.
अवैध धंद्याना रान मोकळे झाले होते. मनमर्जितले ठाणेदार बसवून खेळ खोळंबा करून टाकला होता?

यांच्याच कार्यकिर्दीत चंद्रपूर जिल्ह्यातील बदली मध्ये आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चतारकर यांना आल्या आल्या तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांनी स्थानिक गुन्हे शाखे मध्ये कार्यान्वित केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले नागेश चतारकर हे तीन महिन्या चा कालावधी करून थेट नवीन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार बनले!
पडोली चे तत्कालीन असलेले ठाणेदार शिवाजी कदम यांना बडथी देत गडचांदूर पोलीस स्टेशन ला रुजू केले.

स्थानिक गुन्हे शाखेतून तीन महिन्या चा कार्यकाळ करून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चतारकर यांची पडोली ठाणेदार पदी नियुक्ती केल्याने त्यांच्यावर आपल्या हद्धीत जवाबदारीने काम पार पडण्याची धुरा हाथात आली!

तीन महिन्याच्या कार्यकाळात स्थानिक गुन्हे शाखेतील झालेली जवळीक ही त्यांना फारच लाभदायक असल्याचे बोलल्या जाते.

पडोली पोलीस स्टेशन च्या हद्धीत मुख्यता जवळपास पाच लक्ष रुपयाचे दोन व्यक्तीद्वारा कलेक्शन केल्या जातं असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या ठिकाणी डिझेल – पेट्रोल च्या अवैध दोन व्यवसायाकडून महिन्याकाठी 2 लाख10 हजार रुपये तर चारगाव जाणाऱ्या पाईप लाईन चोरी करणाऱ्या, सोनू कडून एक लक्ष रुपये घेत असल्याचे गुपित माहिती बाहेर आली आहे?

करोडो रुपयाची सरकारी पाईप लाईन भंगार चोर काप- कुप करून पडोली येथील एका मोठ्या भंगार व्यवसायकला विकत असताना मात्र पोलीस खात्याकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चंद्रपूर ओ्षणिक थर्मल पॉवर स्टेशन च्या पाण्यासाठी चारगाव पर्यंत करोडो रुपये लावून पाईप लाईन टाकण्यात आली मात्र त्याची पूर्णतः न झाल्याने पाईप लाईन तशीच अडकून बसली, कालांतराने भंगार चोराच्या नजरा त्या कडे वळल्या आणि त्यावर हाथ साफ करणे सुरु केले.
आता तर चक्क गॅस कटर घेऊनच पाईप लाईन चोरी करण्यात येत असल्याचे दिसत असताना मात्र त्याला पडोली पोलिसांचा “आशीर्वाद”प्राप्त झाला असे म्हणावे लागेल?

या हद्धीत लपून छपून नवं ट्रॅक्टर इरई नदीतून च्या पात्रातून रेती चोरी करतात त्यांचा मासिक दर 7000 रुपये ठरला आहे. याच हद्धीत MIDC चा ही भाग असल्याने तसेच नागाला येथे कोळसा चे डेपो असल्याने वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
ओव्हरलोड ची “एन्ट्री” घेण्याकरिता एक कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केल्या गेला आहे. म्हणजेस मापतोल करता करता छोटा पोलीस स्टेशन चा चार्ज म्हणजे शासकीय पगाराच्या सहा गुना मिळणारा अवैध मार्गातून कमाई चा हिस्सा च मनावे लागेल.

महिन्याकाठी मिळणारी ही रक्कम म्हणजे चोरी ला दिली गेलेली साथ च म्हणावे लागेल अवैध मार्गाच्या मुसक्या आवळा ला लावणाऱ्या पोलीस अधीक्षक यांच्या सूचनाच बहुतेक पडोली पोलीस स्टेशन ला पोहचल्या नसाव्यात?

” हॉट स्पॉट “असणाऱ्या या पोलीस स्टेशन ला जिल्ह्यातील मुख्य केंद्रबिंदू मानल्या जाते. चंद्रपूर आणि घुगुस ला होणारी रेलचेल ह्याच मार्गांवरून होत असल्याने कधी कधी अनेपेक्षित लागलेली लाखोची लॉटरी सुद्धा असते.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!