चंद्रपूर 16 मे – महानगर पालिका ची “अतिक्रमण “तोडक कारवाई सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
आपले तोडक दस्ता घेऊन पोहचणाऱ्या अतिक्रमण विभागाचा कारभार फक्त “गरिबी “रेषा का हा प्रश्न विचारात,
शहर काँग्रेस अध्यक्ष रामू उर्फ रितेश तिवारी यांनी उपस्थित करत आधी पावसाळी उपाय योजना कराव्या,असा महत्व पूर्ण सल्ला महानगर पालिकेच्या आयुक्त विपीन पालिवाल यांना दिला आहे.
शहरात अतिक्रमण तोडक दस्ते कारवाई करीत असताना विशेष प्रकारच्या लोकांना “आश्रय “देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे.
कारवाई ही दाखवण्यापेक्षा उपयुक्त संसाधन करण्याची महानगर पालिका ला आवश्यकता असल्याचे ही त्यांनी पत्रका च्या माध्यमातून सांगितले आहे.
उपरोक्त कारवाईत सामान्य माणसाचा भरडा करणाऱ्या महानगर पालिकेने विशेष अतिक्रमण तोडावे ही मागणी जोर धरत आहे.
राजेश बेले काढणार आयुक्ताची गध्यावर धिंड?
महानगर पालिकेचा गैर व्यवहार खपवून घेतल्या जाणार नाही, आयुक्त विपीन पालिवाल हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा यांचा “एजन्ट “असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन पक्षा चे नेते राजेश बेले यांनी केला.
अतिक्रमण कारवाई करताना पक्षपात केल्या जातं असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे?:आयुक्त यांच्या हेखेखोर आणि उर्मट दडपशाही खपवून न घेता गाढवावर धिंड काढण्याचा राजेश बेले यांनी इशारा दिला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

