Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsबेछूट कोरोनावर नो-मास्कचा ट्रिगर वाढतोय

बेछूट कोरोनावर नो-मास्कचा ट्रिगर वाढतोय

 

 

 

 

 

 

मुस्क्या आवरायला यंत्रणाही कुचकामी

सुशांत घाटे

चंद्रपूर द – देशात कोरोनाचा ओघ ओसरत आहे मात्र धोका अजूनही टळलेला नाही, कोरोनाचे नवे रूप म्हणजे डेल्टा प्लस हा हळूहळू आपले पाय राज्यात पसरवीत आहे.

मात्र कोरोनाला पुन्हा परत येण्यासाठी आमंत्रित कोण करतंय? याच उत्तर म्हणजे आपणचं.

राज्य सरकारने कोरोनाचे नियम लागू केले आहे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सॅनिटायझर चा वापर व मास्क घालणे हे बंधनकारक केले आहे, तरीपण ह्या त्रिसूत्रीचा वापर कुणी करताना सध्या तरी दिसत नाही आहे.

ज्यावेळी कोरोनाचा उद्रेक सुरू होता त्यावेळी मात्र जिल्हा व पालिका प्रशासन मास्क घातला नाही म्हणून दंड वसूल करायचे, मात्र आता कुणी मास्क चा वापर करो की नाही आता याकडे कुणी लक्ष देत नाही.

असेच वातावरण आज चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बघायला मिळत आहे.

आधीचे नियम संपले का? आता कोरोना पूर्णपणे गेला काय? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना भेळसावीत आहे.

राज्य सरकार नियमांचे पालन करा असे वारंवार सांगत असते मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकारीच या नियमांना बगल देत आहे.

पोलीस स्टेशनला गेल्यावर आपल्याला पोलीस कर्मचारी मास्कविना दिसतात, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुद्धा मास्क परिधान केलेले खूप कमी नागरिक असतात.

कोरोनाच्या या नियमांना शासकीय, निमशासकीय वर्गातील अधिकारी विसरत असले तरी राजकीय पटलावर मात्र मास्क न घालता कार्यक्रम आंदोलने घेतले जात आहे, विशेष म्हणजे राज्य सरकारने आधीच आंदोलन, धरणे यावर बंदी घातली आहे.

तरीसुद्धा सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकारी कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना नियम हे फक्त सामान्य नागरिकांनाच लागू आहे काय? राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांना नाही का?

सरकारने कोरोना नियमांत शिथिलता दिल्यावर सुद्धा बाजारपेठ मध्ये नागरिक गर्दी करीत पुन्हा कोरोनाला आमंत्रित करीत आहे.

कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी शासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा हा उद्रेक पुन्हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

याला जबाबदार नागरिक नसून शासकीय कार्यालयात बसलेले अधिकारीच असणार जे या नियमाना स्वतः बगल देत नागरिकांना नियम पाळण्याचे सल्ले देत असतात.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!