Saturday, August 29, 2026
HomeBreaking Newsपरेड सावधान: चंद्रपूरच्या मातीत देशी कट्ट्यांचा थरार, गन कल्चरची रक्तरंजित डायरी आणि...

परेड सावधान: चंद्रपूरच्या मातीत देशी कट्ट्यांचा थरार, गन कल्चरची रक्तरंजित डायरी आणि खामनकर गँगचा खतरनाक खेळ!

चंद्रपूर (राजुरा )-29 ऑगस्ट 2026

गुन्हेगारी जग आणि युवकांचा गन ट्रिगर… हे केवळ एक शीर्षक नाही, तर विदर्भातील राजुरा, स्वास्ती आणि बल्लारपूर शहरात खोलवर रुजलेल्या एका काळ्या आणि भयानक वास्तवाचा आरसा आहे. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘डेली पोस्टमार्टम’ न्यूजने एका खळबळजनक बातमीचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये विश्वासनीय सूत्रांच्या हवाल्याने या तिन्ही शहरांमध्ये तब्बल २२ माऊजर आणि देशी कट्ट्यांची खेप आल्याचे उघड झाले होते.

​गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवण्यासाठी आणि अचूक निशाणा साधण्यासाठी अल्पवयीन मुलांची एक टोळी राजुराच्या घनदाट जंगलात बंदुकीच्या धाकावर “तम्मच्चे पर डिस्को” करत शूटआऊटचा अभ्यास करत होती. ही बातमी समोर येताच खाकी वर्दीच्या यंत्रणेत खळबळ उडाली. गस्त वाढल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत बल्लारपूर शहरातून काही शस्त्रे जप्त केली आणि गुन्हेगारीच्या या पाठशाळेला तात्पुरता ब्रेक लागला. मात्र, हा विश्राम फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच अवैध धंदे, राजकीय आणि सामाजिक वचक निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा टोळ्यांमध्ये खटके उडू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, राजुरा शहरातील एका  टोळीने आपले ट्रक (घोडा) विकून चक्क २० बंदुकीचा नवीन साठा खरेदी केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे?

याच बेफाम गन कल्चरची आणि जुन्या वैमनस्याची रक्तरंजित पावती म्हणजे नुकताच राजुरा शहरात झालेला विनोद उर्फ पापा जाधव याचा थरारक हत्याकांड! राजुराच्या मातीत झालेला हा चौथा गोळीबार आहे. पापा जाधव हा क्रिकेट क्षेत्रातील नामांकित बुकी म्हणून ओळखला जायचा, त्यामुळे राजुरा आणि लगतच्या ग्रामीण भागातील अनेक ‘फंटर’ त्याच्या संपर्कात असायचे. कोणाचेही काही प्रकरण असले की पापा स्वतः पुढे होऊन त्यांची बाजू घ्यायचा आणि सारवासारव करायचा. याच नेतृत्वगुणामुळे आणि वाढत्या प्रभावामुळे विरोधी गँगसोबत त्याचे सतत खटके उडू लागले. अखेर, शेवटच्या टोकाला जात विरोधकांनी पापाचा काटा काढला.

​या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून ते सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. कार्तिक खामनकर (२४), करण मेकालवार, परवेज शेख, करण बाविस्कर आणि कार्तिकचा मोठा भाऊ भुर्जी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून ४ अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

मोहरा चित्रपटात सुनील शेट्टी ज्या प्रकारे एकामागून एक शत्रूला संपवून त्यांच्या फोटोवर काळी क्रॉसची खूण करतो, अगदी तशाच धर्तीवर या खामनकर टोळीने आपले टार्गेट सेट केले होते. त्यासाठी लागणारा अत्याधुनिक अग्निशस्त्र साठा आणि गँग जुळवून पूर्ण तयारी करण्यात आली होती. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार, या टोळीच्या हिटलिस्टवर तब्बल सात जण होते:

  • पहिले टार्गेट: विनोद उर्फ पापा जाधव (ज्याला गोळ्या घालून संपवण्यात आले)
  • दुसरे टार्गेट: पापाचा सावलीसारखा खास मित्र ‘लल्ली’ (राजुरा)
  • तिसरे टार्गेट: पापाचा बिझनेस पार्टनर संदीप भगत
  • इतर टार्गेट्स: चंदन, रिंकू, रामेश्वर आणि गोलू

​ही संपूर्ण यादी डोळ्यांसमोर ठेवून खामनकर गँग या सर्व नावांची कसून रेकी करत होती. एकीकडे अल्पवयीनांना बंदुकीचे धडे दिले जात आहेत आणि दुसरीकडे अशी टार्गेट ठेवत ही गँग शहरात उघडपणे थैमान घालायला सज्ज झाली होती.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!