Saturday, April 18, 2026
HomeBreaking News​खळबळजनक: चंद्रपूरचा 'स्टेनो' की भ्रष्टाचाराचा 'डोनो'? १० कोटींच्या 'चिक्की'चा अमरावतीत धमाका!

​खळबळजनक: चंद्रपूरचा ‘स्टेनो’ की भ्रष्टाचाराचा ‘डोनो’? १० कोटींच्या ‘चिक्की’चा अमरावतीत धमाका!

: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तळ’ ठोकून बसलेल्या ‘जुगाडबाज’ स्टेनोचा कारभार उघड; वजनी फायलींसाठी स्वतःचे ‘काटाघर’ थाटून भ्रष्टाचाराचा लावला अंबरदिवा!

चंद्रपूर/अमरावती: (सुशांत घाटे )
शासकीय खुर्चीचा वापर लोकसेवेसाठी करायचा की स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी? याचे ‘आदर्श’ उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तो ‘सुपरफास्ट’ स्टेनो! गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी ठिय्या मांडून बसलेल्या या महाभागाने भ्रष्टाचाराच्या बाबतीत साक्षात PHD मिळवल्याची चर्चा आता शासकीय वर्तुळात रंगली आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात तब्बल १० कोटी रुपयांची ‘टेबलाखालची’ कमाई करून या ‘चिक्की बाबा’ने प्रशासकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

: फायलींचे ‘काटाघर’ आणि वसुलीचे दरपत्रक

या स्टेनोचा रुबाब एखाद्या बड्या सनदी अधिकाऱ्यालाही लाजवेल असा आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक वजनी फाईलला ‘हात’ लावण्यासाठी याने स्वतःचे एक अलिखित ‘रेट कार्ड’ तयार केले होते. विशेष म्हणजे, एका बड्या अधिकाऱ्याच्या दालनात त्याने स्वतःचे स्वतंत्र ‘काटाघर’ थाटले असून, तिथूनच तो सर्व ‘जुगाड’ चालवायचा. केवळ बाहेरील लोकांकडूनच नव्हे, तर स्वतःच्याच विभागातील सहकाऱ्यांच्या कामासाठीही याने ‘वसुली दंड’ आकारल्याची खळबळजनक माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

: ​💰 अमरावतीत संपत्तीचा डोंगर; १० कोटींचा ‘मेवा’

मूळचा चंद्रपुरात कार्यरत असलेला हा स्टेनो सध्या अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेल्या काळ्या पैशातून अमरावती जिल्ह्यात चल-अचल संपत्तीचा डोंगर उभा केला आहे.
जमिनी  प्रकरणे, भूखंड आणि परमिट लायसन्स: या कामात हा ‘चिक्की मुफ्ता’ एक्सप्रेस वे पेक्षाही वेगाने काम करतो.

दहा कोटींचा आकडा: अल्पशा काळात एका स्टेनोने १० कोटी रुपये कमावले असतील, तर त्याच्या पाठीशी वरदहस्त असलेल्या त्या ‘मोठ्या साहेबांचा’ मेवा किती असेल? असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे.
​”शासकीय क्वार्टरच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या या स्टेनोची जीवनशैली राजेशाही आहे. भ्रष्टाचाराच्या पायावर उभे राहिलेले हे साम्राज्य आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे.”

: ​⚖️ ACB चा ‘तिसरा डोळा’ आणि वजनी फाईल

चिक्की बाबाच्या या ‘इनपुट’ आणि ‘आउटपुट’ सोर्सवर सध्या भ्रष्टाचाराचा ‘तिसरा डोळा’ नजर ठेवून आहे. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्टेनोच्या काळ्या कारनाम्यांची सविस्तर यादी आणि त्याच्या बेनामी संपत्तीचा कच्चा चिट्ठा तयार झाला आहे. लवकरच ही ‘वजनी फाईल’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) स्वाधीन केली जाणार आहे.
​आता या ‘हिरो नंबर ०१’ चा पडदा कधी फाटणार आणि त्याच्यासोबत कोणत्या ‘मोठ्या माशाचे’ नाव बाहेर येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भ्रष्टाचाराच्या घोंघडीखाली दडून बसलेल्या या चिक्कीचा खरा चेहरा ‘डेली पोस्टमार्टम’ लवकरच समोर आणणार आहे.

क्रमशः……

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!