चंद्रपूर – (सुशांत घाटे)लोकशाहीचा चौथा स्तंभ जेव्हा लेखणी उचलतो, तेव्हा सिंहासने हलतात. आजची ही बातमी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस दलाला लागलेली ती वाळवी आहे, जी आतून संपूर्ण यंत्रणा पोखरत आहे. ज्या खाकीवर सामान्य माणसाचा विश्वास आहे, त्याच खाकीच्या आड बसून एका ‘हरामी फॅकल्टी’च्या ठाणेदाराने चक्क सरकारी तिजोरीवरच डाका टाकला आहे. २३ लाख २७ हजार ८७० रुपयांचा सरकारी माल, जो कायदेशीर प्रक्रियेत जप्त होता, तो एका भंगारवाल्याच्या दावणीला बांधून या ‘संधीसाधू’ अधिकाऱ्याने स्वतःची तिजोरी मालामाल केली आहे.
🍁2025 मधील एप्रिलचा तो कपटी ‘प्रहार’ आणि ८ महिन्यांची संशयास्पद शांतता
या प्रकरणाची पाळेमुळे तपासली तर अंगावर काटा येतो. या ठाणेदाराने चंद्रपूरच्या मातीत पाऊल ठेवताच, एप्रिल महिन्यात पहिला ‘प्रहार’ केला. हा प्रहार गुन्हेगारांवर नव्हता, तर पोलीस स्टेशनच्या अंगणात असलेल्या सरकारी मालमत्तेवर होता. अत्यंत थंड डोक्याने, एका भंगार व्यावसायिकाला हाताशी धरून, सरकारी नियमांना पायदळी तुडवत या महाशयांनी सरकारी माल लंपास केला.
🍁: वाशीमचा ८० लाखांचा ‘कॅश’ सौदा: भ्रष्टाचाराचे साम्राज्य!
चंद्रपूरच्या कोळशाच्या खाणीतून मिळालेल्या या अवैध पैशांचा विनियोग कुठे होतोय? याचे उत्तर वाशीम जिल्ह्याच्या ‘मंगरूळ पीर’ मध्ये दडले आहे. ‘डेली पोस्टमार्टम’च्या हाती लागलेल्या विश्वसनीय माहितीनुसार, या ‘तिकट खाऊ’ ठाणेदाराने तिथे ८० लाखांच्या जमिनीचा सौदा केला आहे.
🍁सौद्याचा काळा खेळ:
६० लाख रुपये ‘नगदी’ आणि केवळ २० लाखांची ‘रजिस्ट्री’ दाखवून शासनाचा मुद्रांक शुल्कही बुडवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ‘सांडपाणी’ विदर्भात कसं वळवायचं आणि इथल्या संसाधनांमधून स्वतःचे बंगले कसे उभारायचे, याच ‘ट्रेंडिंग’ विषयावर या ठाणेदाराने जणू काही ‘पीएचडी’ केली आहे
“ठाणेदार साहेब, चंद्रपूरचा कोळसा काळा असतो, पण तुमचं कृत्य तर त्याहूनही काळं निघालं! आम्हाला वाटलं होतं तुम्ही ‘दुर्गा + पूर’चे रक्षणकर्ते व्हाल, पण तुम्ही तर संधी मिळताच सरकारी माल विकणारे ‘संधीसाधू’ निघालात. तुमच्या या ‘बाण’ मारण्याच्या वृत्तीचा आता पोस्टमार्टम होणारच!”
🍁पोलीस अधीक्षकांच्या पारदर्शकतेला ‘सुरुंग’!
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे त्यांच्या पारदर्शक आणि कडक स्वभावासाठी संपूर्ण राज्यात ओळखले जातात. मग त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या या ‘विवादित’ ठाणेदाराची इतकी हिंमत होतेच कशी? पोलीस स्टेशनमधील जप्त केलेले लोखंड, भंगार गाड्या आणि इतर साहित्य हे मालमत्ता कक्षाच्या (Malkhana) ताब्यात असते. न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा रीतसर टेंडर काढल्याशिवाय एक खिळाही हलवता येत नाही. मात्र, या ‘भामट्या’ अधिकाऱ्याने कायद्याला आपल्या खिशात ठेवून हा व्यवहार पूर्ण केला. यावरून असे दिसते की, पोलीस प्रशासनातील काही ‘वरदहस्त’ याला पाठीशी घालत आहेत का?
🍁ACB आणि गृहविभागाला ‘डेली पोस्टमार्टम’चा सवाल!
गृहमंत्री साहेब, राज्याच्या गृहविभागाला हे कळायला हवे की, विदर्भातील गुन्हेगारी संपवण्याआधी आपल्या स्वतःच्या विभागातील या ‘पांढऱ्या हत्तींना’ आवर घालणे गरजेचे आहे. या ठाणेदाराने केलेला २३ लाखांचा घोटाळा हे केवळ हिमनगाचे टोक आहे. याची पाळेमुळे पश्चिम महाराष्ट्र ते विदर्भ अशा सर्वत्र पसरलेली आहेत. या प्रकरणाची साधी ‘विभागीय चौकशी’ (DE) करून काहीही साध्य होणार नाही; यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांनी या ठाणेदाराची मालमत्ता आणि अलीकडच्या काळातील व्यवहार तपासण्याची गरज आहे.
”वर्दीचा माज दाखवून लुटला सरकारी साठा,
भ्रष्टाचाराच्या चिखलात तुझाच मोठा वाटा!
लोखंडी भंगार विकून तू माजवलास स्वतःचा तोरा,
पण लक्षात ठेव, काळाचा न्याय असतो लय कोरा!”
🍁संधीसाधू ‘दीप’ विझवण्याची वेळ!
हा ‘विवादित’ अधिकारी सतत चर्चेत राहिला आहे. कधी कुणाची बाजू घेणे, तर कधी संधी मिळताच स्वतःचा फायदा करून घेणे ही याची जुनीच खोड आहे. ‘दुर्गा+पूर’च्या नावाने मालामाल होणारा हा अधिकारी आता कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये. जर गृहखात्याने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर खाकीवरचा उरलासुरला विश्वासही उडेल.
🍁खाकीचा माज, तिजोरीचा घात,
भ्रष्टाचारात बुडालाय तुझाच हात!
भंगारात विकली सरकारी शान,
पण काळाचा न्याय देईल अखेर हिसाब-किताब पूर्ण प्रमाण!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

