Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsबल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्या प्रकरणी,प्रोफेशनल आरोपीना मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर मधून चंद्रपूर LCB...

बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्या प्रकरणी,प्रोफेशनल आरोपीना मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर मधून चंद्रपूर LCB च्या पथकाने केली अटक

चंद्रपूर 23 जुलै

– बल्लारपूर शहरातील चर्चित मालू वस्त्र भंडार वर पेट्रोल बॉम्ब हल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आसाम, इंदोर, जबलपूर येथे पाठलाग करीत दोन आरोपीना बेडया ठोकत अटकेत घेतले आहे. बल्लारपूर प्रकरणाचे विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटिवार यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले असताना स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांचा समांतर तपास सुरु असताना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या सतत मागावर होते. मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी होत असताना त्यांना मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथून अटक करीत मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात आणखी ही काही आरोपीना लवकरच अटक होणार असून पोलिसांचे पथक पाठलाग करीत आहे. या गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेश येथील प्रोफेशनल गुन्हेगारी क्षेत्रातले असून पोलीस त्त्यांची कसून चौकशी करीत आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी हद्दपार करण्याकरिता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेण्याच्या सूचना सर्व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकड़े बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब प्रकरणाचा तपास असून आणखी काही आरोपी त्यांच्या रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!