Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsराज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा भ्रष्टाचार! मंत्रीचे हिरामणे, मोहिते तसेच आयुक्त चे...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा भ्रष्टाचार! मंत्रीचे हिरामणे, मोहिते तसेच आयुक्त चे सुरेश कांबळे यांचे रेट कार्ड? पैसे दिल्या शिवाय कामच होणार नाही?

चंद्रपूर -22 जुलै (सुशांत घाटे )

💥💥💥💥
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार इतका फोफावला आहे की, कुठल्याही दारू दुकानासंदर्भात फाईल वर स्वाक्षरी करासाठी मंत्रालयात लाखो रुपये द्यावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते (शरद पवार गट ) दीपक जयस्वाल यांनी केला आहे.

आयुक्त यांच्या स्वीय सहाय्यक असलेले सुरेश कांबळे यांनी तर रेट कार्ड च ठरवून ठेवल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी मंत्रालयात राहून सुरेश कांबळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांची वसुलीचा फंडा घेत कोट्यवधीची चल अचल संपत्ती जमवत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

💥ज्या प्रकरणावर निपटारा नाही होत ते राज्य उत्पादन खात्याच्या मंत्री शंभूराजे देसाई महोदया कडे पाठवण्यात येते तेतेही मंत्रीचे खासगी स्वीय सहाय्यक हिरामणे तसेच असीस्टंट मोहिते यांनी सुद्धा 10-15-20-25 लाखाचे देशी- विदेशी दुकानासंदर्भात प्रकरणे पाऊन रेट कार्ड ठरवला असल्याचा घणघनाती आरोप दीपक जयस्वाल यांनी केला आहे. पैसे दिल्या शिवाय फाईल च पुढे येत नसून,आधी पैसे मोजा तरच काम होणार असा सुतोवाचच मंत्राच्या खासगी सचिवाने करून टाकला असल्याचा आरोप सुद्धा केला आहे.

💥मंत्रालयातील सर्व विभागात हेच हाल असून अनेक जन आपले प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यासाठी लाचेच्या स्वरूपात रक्कम देतात, पण ज्यांची परिस्थिती नसते ते मंत्रालयाच्या चकराच मारत असते? निराशाजनक परिस्थितीत मग ते आत्महत्या करतात कधी मंत्रालयाच्या माळ्यावरून, तर कधी विष पियुन, तर कधी स्वतःला जाळून असे कितीतरी धक्कादायक प्रकरणे झाले असताना मात्र यांची भ्रस्टाचाराची भूक काही मिटत नाही त्यामुळे यांच्या सर्वांच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत चौकशी करून यांना कारागृहात डाबंण्याची मागणी दीपक जयस्वाल यांनी एक पत्र लिहीत केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!