Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsनायक.... DYSP सुशील कुमार नायक, नांदेड ग्रामीण!

नायक…. DYSP सुशील कुमार नायक, नांदेड ग्रामीण!

चंद्रपूर/यवतमाळ/नांदेड 02 मे –” नायक “…… सुशील कुमार नायक…नावातच नायक असताना कामगिरी पण त्या सारखीच, चंद्रपूर जिल्ह्यात त्यांची प्रोबेशन काळात दारूबंदी ला फटके देत सुरवात त्यांच्या कार्याची तत्परता बघता पहली उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून चंद्रपुरात च त्यांची नियुक्ती झाली होती.

अधिकारी कसा असावा हे त्यांच्या प्रामाणिक आणि अभ्यासकीय स्वभावातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेने अनुभवले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील “वसमत ” हे त्यांचे मूळ गाव.
. गुन्हेगारी क्षेत्रात वरदहस्त असणाऱ्या टोळ्यांना उध्वस्त करण्याचा धाडस सुशील कुमार नायक यांनी त्या वेळेस केला.2017 ते 2019 पर्यंत च्या कालखंडात त्यांनी चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी च्या रूपात सुरवात केली.

तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या नेतृवांत सुशील कुमार नायक यांनी घरफोड्या, दारूबंदी, अट्टल गुन्हेगारी, हत्या, दरोडे यांचे अनेक तपास करीत आपल्या चाणक्य नीती ने चंद्रपूरातील गुन्हेगारी क्षेत्राला हद्दपार केले.
नायक आले म्हटले तरी… गुन्हेगार धूम ठोकत होते… त्यांच्या प्रतीचा उमदा अधिकारीची वाटचाल ही त्यांच्या कर्तृत्व आत्मीयताचा एक गुणवत्ता म्हणावी लागेल.
त्यांची ही सुरवात यशाचे शिखरावर पोहचत होते.

त्यांच्यातील जनसामान्य नागरिकांना मिळणारा प्रतिसाद एक उत्तम पोलीस अधिकारी च्या भावना निर्माण करणाऱ्या होत्या. त्यांची हीच सुरवात त्यांना हळू हळू दुसऱ्या पोस्टिंग घेऊन गेली.

ती म्हणजे यवतमाळ जिल्हातील वणी उपविभागीय पोलीस अधिकारी येथे. तेथेही त्यांच्या कार्यशैली चा चांगलाच धाक बसला. अवैध धंद्या च माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी ला त्यांनी सुधारित वणी निर्माण करण्याचे धाडस निर्माण केले.
जुगार, सट्टा, क्रिकेट बूकी यांची वरात काढत त्यांनी फुटबॉल सारखे तुडवत गुन्हेगारी क्षेत्राला चाप बसवीला.
यानंतर परत तिसरी पोस्टिंग त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर ( नांदा फाटा, आवारपूर )येथे मिळाली.

त्यांची विश्वासनियता आणि कायद्याची अंमलबजावणी साठी पोलीस विभागातील स्ट्रॉंग प्लेअर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. जिल्ह्यात महत्वपूर्ण घटना घडली की लगेच सुशील कुमार नायक यांना पाचारण करण्यात येत होते. भद्रावती येथील डबल मर्डर, जिवती तालुक्यातील क्रिटिकलं मर्डर आणि जिल्ह्यातील कुठल्या ही ठिकाणी भरारी पथका सारखे तपासासाठी महत्वपूर्ण मोलाचे त्यांनी त्यावेळेस योगदान दिले.

त्यांचा जिल्ह्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांशी थेट चांगला सुसंवाद असल्याने त्यांची प्रचिती एकदमच मनमिळाऊ होती. मी अधिकारी नाही तर तुमच्यासारखाचा एक कर्मचारी समजा करत ते मन जिकूंन घ्यायचे.

त्यानंतर त्यांची जळगाव येथे बदली झाली होती. मात्र काही प्रशासकीय अडचणीने त्यांना त्या ठिकाणी जॉईन होता आले नाही.
काम करण्याची कला, आणि शिस्तीतले अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली. लगेच त्यांची नांदेड ग्रामीण येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या बदली ने जाता जाता त्यांच्या आठवणी ला उजाळा देत,चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला डोळ्यातून पाहता येत होत्या.
जिद्दी, चिकाटी दाखवत त्यांनी मुस्लिम बहुल असणाऱ्या या विभागात गुन्हेगारी आल्या आल्या चांगलाच चाप बसवला. त्यांच्या कार्याची नांदेड पोलिसांत चांगलीच चर्चा रंगली… कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीना या ठिकाणी त्यांनी उध्वस्त करण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यांचा दरारा इतका आहे की गुन्हेगारी क्षेत्रातले व्यक्ती डोकं काढण्याच्या आधी कुठे नायक तर नाही आहे.. हे बघतात.

प्रामाणिक अधिकाऱ्यांची ही भावना अनेकांची प्रेरणा ठरु शकते. यांच्या सारखा अधिकारी भेटणे म्हनजे एक आदर्श च समजावा.
महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक उत्तम अधिकाऱ्यांनी सुपर कॉप ची भूमिका बजावली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ही अशे अनेक अधिकारी लोकांच्या मनात घर करून गेले आहे.

चंद्रपूर च्या यादीमध्ये पोलीस अधीक्षक च्या रूपात रवींद्रजी कदम, डॉ. मनोजकुमार शर्मा, सुवेज हक, छेरिंगजी दोरजे, अरविंदजी साळवे, आणि हल्ली मुम्मका सुदर्शन यांची जिल्ह्यातील विश्व्सनियतेची जनभावना निर्माण करणारी कार्यप्रणाली राहली आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी रूपात ही अनेक नामवंत अधिकाऱ्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. राजेंद्रजी बनसोडे, पराग जी मनेरे, डॉ. राजू भुजबळ, वैभवजी कलुबर्मे, सुधीर नंदनवार आणि हल्ली चे वर्तमान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव जी यांच्या कार्यप्रणाली सुद्धा मनमिळाऊ,आणि प्रामाणिक पणे आपले कर्तव्य जपत सामाजिक जवाबदारी जोपत कार्य प्रणाली ची निर्माण झाली आहे.
पोलीस विभागातील अशा अधिकाऱ्यांच्या असण्याने महाराष्ट्र पालिसांची कामगिरी म्हणजे दमदार च मानावे लागेल.
………………….

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!